मुंबई

एसटी स्थानक स्थलांतराचा घाट

CD

मैत्री पार्क एसटी स्थानक स्थलांतराचा घाट?
चेंबूरकर निर्णयाविरोधात एकवटले
जीवन तांबे, सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १४ : मुंबईच्या पूर्व उपनगरातील ऐतिहासिक ओळख बनलेल्या मैत्री पार्क एसटी बस स्थानक अन्य ठिकाणी स्थलांतराचा घाट घालण्यात येत आहे. मात्र, हा थांबा वाचवण्यासाठी स्थानिक नागरिक एकवटले आहेत. या निर्णयाविरोधात नागरिकांनी स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे.

सायन-पनवेल मार्गावरील मैत्री पार्क एसटी बस थांबा हा महत्त्वाचा थांबा ओळखला जातो. भांडुप, मुलुंड, विक्रोळी, कुर्ला, चेंबूर अशा अन्य परिसरातील कोकण, सातारा, पुणे, सोलापूर, गोवा, कर्नाटक येथे जाणारे प्रवासी या एसटी बस थांब्याचा गेली ५० पेक्षा अधिक वर्षे वापर करीत आहेत. गणेशोत्सव, दिवाळी आणि उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात शेकडो प्रवासी या स्थानकातून प्रवास करीत असल्याने चेंबूर मैत्री पार्क एसटी बस थांबा मुबंई, उपनगरातील प्रवासी व कुटुंबाचा अविभाज्य भाग बनला आहे. मेट्रो प्रकल्प आणि वाढत्या वाहतूक कोंडीमुळे प्रशासनाकडून पर्यायी नियोजनाचा विचार सुरू असल्याची चर्चा आहे. या परिसरातील नागरिकानी याविरोधात मोहीम सुरू केली आहे.

मात्र मैत्री पार्क एसटी बस थांबा स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी स्थानिक जनतेच्या भावना, प्रवाशांची गरज आणि परिसराच्या सामाजिक वास्तवाचा विचार करावा, अशी नागरिकांची भावना आहे. स्वाक्षरी मोहिमेत शिवसेना ठाकरे गटाच्या स्थानिक नगरसेविका मिनाक्षी पाटणकर सह असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.
.............…..........

मैत्री पार्क एसटी स्थानक हे केवळ बस थांबा नसून लाखो प्रवाशांच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. वाहतूक कोंडीचे कारण पुढे करून स्थानक स्थलांतरित करण्याचा निर्णय अन्यायकारक ठरेल.
- अंकुश महामुलकर, प्रवासी
....................
हे स्थानक हटविण्याऐवजी वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम करावे. सुरक्षा रक्षक, वाहतूक पोलिस आणि पार्किंगचे योग्य नियोजन केल्यास कोंडीची समस्या कमी होऊ शकते.
अजित अरवंदेकर, स्थानिक रहिवासी
....................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT