मुंबई

डिलिव्हरी बॉईजना वाढत्या उन्हाचा तडाका

CD

मुंबई, ता. १४ : उन्हाळ्यातील अति उष्णतेच्या लाटांमुळे डिलिव्हरी रायडर्स, राइड-हेलिंग ड्रायव्हर्स आणि होम सर्व्हिसेस कामगारांना भर दिवसा काम करताना प्रचंड हाल होत आहेत. स्विगी, झोमॅटो, झेप्टो, ब्लिंकिट, अर्बन कंपनी, रॅपिडो यांसारख्या प्लॅटफॉर्मवर लाखो गिग वर्कर्स काम करतात. प्लॅटफॉर्म अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या या कामगारांसाठी उष्णता संरक्षण हे मूलभूत मानवाधिकार आहे. दक्षिण कोरिया, सिंगापूर, फ्रान्स, जपानप्रमाणे भारतानेही असे नियम आणावेत, अशी मागणी गिग संघटनांकडून केली जात आहे.

मुंबईत तापमानात झालेली वाढ पाहता पुढे तीव्र उष्णता असणार आहे. उष्णतेच्या लाटांमुळे घराबाहेर पडले की घामाच्या धारा येत आहेत. या उन्हाच्या तडाख्यातही गिग वर्कर आपली सेवा देत आहेत; पण त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः महिला गिग वर्कर्सना सुरक्षित व स्वच्छ शौचालयांची मोठी अडचण भेडसावत आहे. तसेच डिलिव्हरी कामगारांकडे मोठ्या प्रमाणात सामान व बॅग्ज असल्यामुळे ते रस्त्यावर सामान ठेवून मॉल किंवा इतर खासगी ठिकाणी जाऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या सन्मानाने आणि सुरक्षिततेने काम करण्यासाठी महापालिकेने तातडीने पुढाकार घेणे आवश्यक आहे. मुंबई महापालिकेने गिग वर्कर्ससाठी मानवी दृष्टिकोनातून या मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी केली जात आहे.

उन्हाच्या वाढत्या तडाख्यामुळे मुंबई शहरातील गिग वर्कर्स, विशेषतः डिलिव्हरी बॉईज, राइडर्स आणि महिला गिग वर्कर्स यांना अत्यंत कठीण परिस्थितीत काम करावे लागत आहे. दिवसभर रस्त्यावर राहून सेवा देणाऱ्या या कामगारांसाठी सावली, विश्रांती, पिण्याचे पाणी, दुपारचे जेवण करण्यासाठी जागा आणि स्वच्छ शौचालय या मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. बंगळूरच्या धर्तीवर मुंबई पालिकेनेही शहरातील ज्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर गिग वर्कर्स काम करतात, त्या ठिकाणी तात्पुरते ‘गिग वर्कर पॉड्स’ उभारणे अत्यंत गरजेचे आहे.
- डॉ. केशव क्षीरसागर, अध्यक्ष, भारतीय गिग कामगार मंच

उन्हाळा वाढल्यामुळे गिग कामगारांच्या आरोग्यावर आणि कामावर परिणाम होत आहे. उन्हाने अनेक कामगार आजारी पडत आहेत. दुपारी १२ ते ३ या वेळेत कामगार बाहेर पडणे टाळतात. तसेच जे कामगार डिलिव्हरी करीत आहेत, ते जास्त ऊन असेल तर डिलिव्हरीनंतर १० ते १५ मिनिटांचा ब्रेक घेतात.
- सुशांत दरवेशी, गिग कामगार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Coastal Road Closed : मुंबई कोस्टल रोड उद्या ५ तास बंद... कसे असतील पर्यायी मार्ग, प्रवास करण्यापूर्वी नक्की वाचा

Nitin Gadkari : अक्कलकोट विधानसभेच्या आणखी दोन महत्त्वाच्या कामाला मंजुरी देण्याची गडकरींची घोषणा; विकास कामात राजकारण न करण्याचे केले आवाहन

Pune News : पेशवेकालीन भूमिगत जलवाहिनी जीर्णोद्धारास स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी

CGHS नियमांमध्ये मोठा बदल! आता आई-वडील किंवा सासू-सासरे यांच्यापैकी एकालाच मेडिकल लाभ मिळणार; नवा नियम लागू

PBKS vs MI Live : शार्दूल ठाकूरची 'स्टम्प' तोड गोलंदाजी! पंजाबने ३३ धावांत गमावले ६ फलंदाज; 'लॉर्ड'च्या ४ विकेट्सने फिरली मॅच Video

SCROLL FOR NEXT