मुंबई

महाराष्ट्र बाजारपेठेच्या वर्धापन दिनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

CD

महाराष्ट्र बाजारपेठेच्या वर्धापनदिनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई, ता. १४ : ‘महाराष्ट्र बाजारपेठ-आपली बाजारपेठ’ या ब्रीदवाक्याखाली कार्यरत असलेल्या महाराष्ट्र बाजारपेठ संस्थेचा नववा वर्धापनदिन व गुणगौरव पुरस्कार सोहळा दादर येथील श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. १ मे २०१७ रोजी स्थापन झालेली ही संस्था आता आपल्या कार्याचा विस्तार करत दहाव्या वर्षात पदार्पण करीत आहे.

गुरुवारी (ता. ७) आयोजित या सोहळ्याचे आयोजन संस्थापक अध्यक्ष डॉ. कौतिक दांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात सीईओ अनुजा दांडगे यांचेही विशेष योगदान लाभले. या सोहळ्यात सामाजिक, सांस्कृतिक, पत्रकारिता, कला, व्यावसायिक आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना गुणगौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातील कर्तृत्ववान व्यक्तींना एकाच व्यासपीठावर आणत त्यांच्या कार्याचा गौरव करणारा हा कार्यक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला. कार्यक्रमाला मनोरंजन क्षेत्रातील अनेक नामांकित कलाकार आणि मान्यवरांनी हजेरी लावली होती. यामध्ये पार्श्वगायिका कविता राम, अभिनेत्री साक्षी गांधी, प्राजक्ता केळकर, अभिनेते अनिकेत केळकर, कोरिओग्राफर दीपिका जाधव, भूमी जाधव, निर्माते कुडाळकर तसेच विधानसभा सचिव डॉ. विलास आठवले, नगरसेवक यशवंत किल्लेदार यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Coastal Road Closed : मुंबई कोस्टल रोड उद्या ५ तास बंद... कसे असतील पर्यायी मार्ग, प्रवास करण्यापूर्वी नक्की वाचा

Nitin Gadkari : अक्कलकोट विधानसभेच्या आणखी दोन महत्त्वाच्या कामाला मंजुरी देण्याची गडकरींची घोषणा; विकास कामात राजकारण न करण्याचे केले आवाहन

Pune News : पेशवेकालीन भूमिगत जलवाहिनी जीर्णोद्धारास स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी

CGHS नियमांमध्ये मोठा बदल! आता आई-वडील किंवा सासू-सासरे यांच्यापैकी एकालाच मेडिकल लाभ मिळणार; नवा नियम लागू

PBKS vs MI Live : शार्दूल ठाकूरची 'स्टम्प' तोड गोलंदाजी! पंजाबने ३३ धावांत गमावले ६ फलंदाज; 'लॉर्ड'च्या ४ विकेट्सने फिरली मॅच Video

SCROLL FOR NEXT