मुंबई

पावसाळ्यात डॉ. अमरापूरकर घटना घडू नये

CD

पावसाळ्यात डॉ. अमरापूरकर घटना घडू नये!
१० वर्षांपूर्वी व आताचे नाल्याशेजारील सॅटेलाइट इमेज काढा
नाल्यावर किती अतिक्रमण झाले स्पष्ट होईल
सभागृह नेते स्थायी समितीत आक्रमक

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ ः पूर्व उपनगरातील नालेसफाईच्या पाहणीत धक्कादायक वास्तव समोर आले. डेब्रिज टाकले होते, प्लास्टिक बाॅटल्यांचा खच, ट्रश बूमचे कंत्राट मार्च महिन्यात संपले, गोवंडी येथील नाल्यांवर झोपडपट्ट्यांचे अतिक्रमण झाले आहे, असा आरोप सभागृह नेते गणेश खणकर यांनी मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत केला.
दरम्यान, १० वर्षांपूर्वी नाल्याशेजारी काय स्थिती होती आणि आता काय स्थिती आहे, यासाठी सॅटलाइट इमेज काढा, सगळं समोर येईल, असे खणकर यांनी स्पष्ट केले. पावसाळ्यात डॉ. अमरापूरकर यांच्याबाबतीत दुर्दैवी घटना घडली तशी घडू नये, याकडे खणकर यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले.
नालेसफाईच्या कामाला उशिरा सुरुवात झाली. मिठी नदीतील गाळ उपसा होत नाही. गाळ वाहून नेणाऱ्या वाहनांच्या ३,६०४ ट्रीप झाल्या, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. याचा अर्थ १० दिवसांत १,८०० ट्रीप म्हणजेच एका दिवसात १८० ट्रीप हे कसे शक्य आहे. याची तपासणी करण्यासाठी त्याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत का? मिठी नदीच्या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला, असा आरोप काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी यांनी स्थायी समितीत केला. झोनमध्ये नालेसफाईच्या कामासाठी मनुष्यबळ नाही, सभागृह नेते कुठे पाहणी करतात माहीत नाही; पण नालेसफाई किती झाली, याची पाहणी करण्यासाठी आम्हाला बरोबर घेऊन जा, असा टोला आझमी यांनी सत्ताधारी पक्षाला या वेळी लगावला.
नालेसफाईच्या मुद्द्यावर पाऊण तास चर्चा झाली. घाटकोपर येथे मंगळवारी पाहणी केली, त्याठिकाणी खाडीजवळ अतिक्रमण झाले. २०११पर्यंतच्या झोपड्यांना आमच्याच सरकारने संरक्षण दिले; मात्र आता जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिणार असून नाले अतिक्रमणमुक्त करा, अशी मागणी करणार असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी या वेळी सांगितले.
डेब्रिज टाकण्याचा प्रकार, निविदा प्रक्रियेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवा, स्थायी समिती सदस्यांनी कुठे पाहणी करायची सांगावे, पाहणी करू, सादरीकरण नको, प्रत्यक्ष काम बघावे, नालेसफाईच्या कामात दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रभाकर शिंदे यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Coastal Road Closed : मुंबई कोस्टल रोड उद्या ५ तास बंद... कसे असतील पर्यायी मार्ग, प्रवास करण्यापूर्वी नक्की वाचा

Nitin Gadkari : अक्कलकोट विधानसभेच्या आणखी दोन महत्त्वाच्या कामाला मंजुरी देण्याची गडकरींची घोषणा; विकास कामात राजकारण न करण्याचे केले आवाहन

Pune News : पेशवेकालीन भूमिगत जलवाहिनी जीर्णोद्धारास स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी

CGHS नियमांमध्ये मोठा बदल! आता आई-वडील किंवा सासू-सासरे यांच्यापैकी एकालाच मेडिकल लाभ मिळणार; नवा नियम लागू

PBKS vs MI Live : शार्दूल ठाकूरची 'स्टम्प' तोड गोलंदाजी! पंजाबने ३३ धावांत गमावले ६ फलंदाज; 'लॉर्ड'च्या ४ विकेट्सने फिरली मॅच Video

SCROLL FOR NEXT