केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
एनएसयूआयकडून निदर्शने
मुंबई, ता. १४ ः नीटच्या पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा. तसेच त्यांच्यासह या प्रकरणात सहभागी असलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी आज मुंबई काँग्रेसच्या कार्यालयासमोर एनएसयुआयच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार निदर्शने केली.
या वेळी केंद्रीय मंत्री प्रधान यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला. मात्र, पोलिसांच्या सावधगिरीमुळे हा प्रसंग टळल्याचे दिसून आले. एनएसयुच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला. पेपरचोर, गद्दी छोड, तसेच धमेंद्र प्रधान यांना पेपर लिक मिनिस्टर, म्हणत त्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा, आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या. या आंदोलनात मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई आदी परिसरातील एनएसयूआयचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.