मुंबई

टाकाऊ वस्तूंमधून साकारली ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राची प्रतिकृती

CD

टाकाऊ वस्तूंमधून साकारली ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राची प्रतिकृती
कलाकृतीतून स्वच्छतेसोबत देशभक्तीचा संदेश; खारघरमधील सफाई कामगारांचा अभिनव उपक्रम
खारघर, ता. १४ (बातमीदार) : स्वच्छता अभियानाला जनजागृतीची जोड देत खारघर परिसरातील सफाई कामगारांनी टाकाऊ वस्तूंमधून ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राची आकर्षक प्रतिकृती तयार केली आहे. ‘वेस्ट टू आर्ट’ या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
पनवेल महापालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत सफाई कर्मचाऱ्यांनी जुने टायर, लोखंडी पत्रे, प्लॅस्टिक साहित्य, लाकूड आणि इतर टाकाऊ वस्तूंचा वापर करून ब्रह्मोस क्षेपणास्त्राची प्रतिकृती उभारली आहे. विशेष म्हणजे, या प्रतिकृतीस सैनिकी वाहनाचा देखावा देण्यात आला असून, त्यावर ‘स्वच्छ खारघर, सुंदर खारघर’ असा संदेशही देण्यात आला आहे. ही कलाकृती खारघर परिसरातील नागरिकांचे तसेच वाहनचालकांचे लक्ष वेधून घेत आहे. परिसरातून जाणारे अनेक नागरिक या उपक्रमासमोर थांबून छायाचित्रे काढत आहेत. स्वच्छता राखण्याबाबत जनजागृती करण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम प्रभावी ठरत आहेत.
देशाच्या सुरक्षेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राची निवड करून त्यांनी देशभक्तीचा संदेशही दिला आहे. पनवेल महापालिकेकडून राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता अभियानात नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, कचऱ्याचे वर्गीकरण करावे आणि टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करावा, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे. खारघरमधील सफाई कर्मचाऱ्यांच्या या अभिनव कल्पकतेचे विविध सामाजिक संघटना, नागरिक आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी अभिनंदन केले आहे.

चौकट :
खारघरमधील शिल्प चौक येथे ठेवण्यात आलेल्या या ब्रह्मोस मिसाईल प्रतिकृतीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ही प्रतिकृती तयार करण्यासाठी जुने बॅनरचे लाकडी व लोखंडी रीप, सन बोर्डचे जुने बॅनर, रिक्षाचे जुने टायर, खराब झालेले पीयूसी पाइप, रंगाच्या डब्यांची झाकणे, पत्र्याचे रंगाचे डबे, प्लॅस्टिकच्या बाटल्या, कार्डबोर्ड पेपर, फेकण्यात आलेली काच तसेच इतर टाकाऊ साहित्याचा वापर करण्यात आला आहे. सफाई कर्मचाऱ्यांनी अत्यंत कल्पकतेने या साहित्याचे रूपांतर ब्रह्मोस मिसाइल मध्ये केले आहे.

कोट :
ब्रह्मोस मिसाईल या प्रतिकृतीच्या टायरवर प्रगतशील पनवेल, माझी वसुंधरा, ‘सफाईमित्र सुरक्षा चॅलेंज, ओला व सुका कचरा वर्गीकरण’, पनवेल महापालिका लोगो, आझादी का अमृत महोत्सव आणि एक कदम स्वच्छता की ओर या घोषणांचा समावेश आहे. ही प्रतिकृती स्वच्छतादूतांनी १० दिवसांत टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करून तयार केली आहे.
- जितेंद्र मढवी, अधीक्षक तसेच स्वच्छता अधिकारी, खारघर प्रभाग कार्यालय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT