मुंबई

खारघरमध्ये ६०० शासकीय दाखल्यांचे वाटप

CD

खारघरमध्ये ६०० शासकीय दाखल्यांचे वाटप
खारघर, ता. १४ (बातमीदार) : पनवेल तहसील कार्यालय आणि भारतीय जनता पार्टी, खारघर यांच्या वतीने मंगळवारी (ता. १२) खारघर सेक्टर १२ मधील राजा गणेश मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या शासकीय दाखले वाटप शिबिरात जवळपास ६०० दाखल्यांचे वितरण करण्यात आले.
या शिबिरात उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, निवासी दाखला, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, आधार नोंदणी तसेच मतदार एसआयआर मॅपिंग आदी विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्याने नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. विशेषतः दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक असलेले दाखले सहज उपलब्ध झाल्याने पालक आणि विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी मंडळ अधिकारी आरती रेवसकर यांच्यासह कळंबोली मंडळ विभागातील सर्व महसूल अधिकारी उपस्थित होते. तसेच आमदार विक्रांत पाटील यांनी शिबिराला भेट देऊन उपक्रमाची पाहणी केली. नागरिकांना एकाच ठिकाणी विविध शासकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT