उपकरप्राप्त इमारतीमधील
रहिवाशांसाठी तक्रार निवारण प्रणाली
मुख्य कार्यकारी अधिकारी जयस्वाल यांच्या हस्ते उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : दक्षिण मुंबईतील जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पात मूळ भाडेकरू, रहिवाशांना विकसकाकडून मिळणारे संक्रमण भाडे (ट्रान्झिट रेंट), सदनिकांचा ताबा व इतर तक्रारींचे आता तत्काळ निवारण होणार आहे. त्यासाठी म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने तक्रार निवारण व्यवस्थापन प्रणाली विकसित केली आहे. त्याचे आज म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या फ दक्षिण विभागाच्या दादर पूर्व येथील विभागीय कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर, म्हाडाचे मुख्य अभियंता धीरजकुमार पंदीरकर, महेश जेसवानी, सुनील ननावरे, म्हाडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखडे, सहमुख्य अधिकारी उमेश वाघ, उपमुख्य अभियंता अनिल अंकलगी आदी उपस्थित होते.
तक्रार निवारण व्यवस्थापन प्रणाली, या डिजिटल यंत्रणेच्या माध्यमातून भाडेकरू आणि रहिवाशांच्या समस्या वेळेत, पारदर्शकपणे आणि संवेदनशीलतेने सोडवण्यासाठी म्हाडाने उचललेले एक लोककेंद्रित पाऊल असल्याचे संजीव जयस्वाल यांनी स्पष्ट केले. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पात मूळ भाडेकरू/रहिवासी यांना विकसकाकडून मिळणारे संक्रमण भाडे व इतर तक्रारींचे निवारण अधिक जलदगतीने करून नागरिकांना अधिक चांगल्या सेवा देणे शक्य होईल. हा उपक्रम म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारतींतील भाडेकरू/रहिवासी यांना अधिक प्रभावी, पारदर्शक आणि वेळेत सेवा देण्याच्या म्हाडाच्या बांधिलकीचा भाग असल्याचे जयस्वाल यांनी स्पष्ट केले. तसेच प्रत्येक नागरिकाची समस्या ऐकली जावी आणि तिचे वेळेत निवारण व्हावे, हीच या उपक्रमामागची खरी भावना असल्याचे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले.
उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पातील भाडेकरू/रहिवासी, विकसक आणि इतर संबंधितांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींची नोंदणी, पाठपुरावा व निवारण प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक, कार्यक्षम करण्यासाठी ही केंद्रीकृत डिजिटल प्रणाली विकसित करण्यात आली आहे.
अभिप्राय नोंदवता येणार
या प्रणालीची लिंक म्हाडाच्या https://mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर नागरिकांसाठी (Citizen Corner) या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्राप्त तक्रारींची, उपअभियंते पडताळणी करतील, ई-मेलद्वारे तक्रारदारांना सूचना पाठवतील, सुनावणीच्या तारखा निश्चित करतील आणि प्रकरणांची स्थिती अद्ययावत करतील. विकसकांना त्यांच्या प्रकरणांची माहिती पाहता येणार असून आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आणि अभिप्राय नोंदवता येणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.