मुंबई

दूषित पाण्यामुळे आजारांचा फैलाव

CD

अंबरनाथ, ता. १४ (वार्ताहर) : पूर्वेतील बी-केबिन रोड परिसरातील शिवशक्तीनगरमध्ये अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या अनियमित, अपुऱ्या आणि दूषित पाणीपुरवठ्याविरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. संतप्त महिलांनी गुरुवारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी) कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. आज हात जोडले आहेत; मात्र वेळ आल्यावर हात सोडणार, असा इशारा नगरसेविका रोहिणी भोईर यांनी दिला. तर समस्या तातडीने न सुटल्यास शिवसेना स्टाइलने आंदोलन छेडले जाईल, असा इशारा माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांनी दिला.

शिवशक्तीनगर परिसरात नागरिकांना कमी दाबाने तसेच दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप स्थानिक महिलांनी केला. नळातून येणाऱ्या पाण्याला पिवळसर रंग असून त्यातून उग्र दुर्गंधी येत असल्याने ते पिण्यासह घरगुती वापरासाठीही अयोग्य ठरत असल्याची तक्रार करण्यात आली. दूषित पाण्यामुळे त्वचारोग, खाज तसेच विविध संसर्गजन्य आजारांचा त्रास वाढत असल्याची तक्रारही महिलांनी केली. यावेळी महिलांनी दूषित पाण्याच्या बाटल्या घेऊनच एमजेपी कार्यालय गाठत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, नगरसेविका रोहिणी भोईर, अमृता मोहरिकर यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

शहरातील वाढती लोकसंख्या, जुन्या व गंजलेल्या वाहिन्या, अनधिकृत नळजोडण्या आणि सुरू असलेल्या बांधकामांमुळे पाणीपुरवठा व्यवस्थेवर ताण वाढल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी गटारांमधूनच वाहिन्या टाकल्याने दूषित पाणी थेट घरांपर्यंत पोहोचत आहे. घरातील फरशी धुतानाही दुर्गंधी पसरत असल्याने या पाण्याचा वापर करणे कठीण झाल्याची व्यथा महिलांनी मांडली.


अंबरनाथकरांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी २००५ मध्ये चिखलोली धरण उभारण्यात आले. मात्र, धरणातील वाढता गाळ आणि रखडलेल्या उपाययोजनांमुळे आज शहरावर भीषण पाणीटंचाईची वेळ आली आहे. प्रचंड उष्मा आणि दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून ‘धरण उशाला आणि कोरडा घशाला’ अशी अवस्था झाली आहे. आज आम्ही प्रशासनाला निवेदन दिले आहे; मात्र ठोस उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल.
- मनीषा वाळेकर, माजी नगराध्यक्षा


नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू
नगरसेविका रोहिणी भोईर यांनी प्रशासनावर निष्क्रियतेचा हल्लाबोल करत, वारंवार तक्रारी करूनही एमजेपी आणि पाणीपुरवठा विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. जलवाहिनी स्वच्छता, गळती दुरुस्ती आणि सांडपाणी वाहिनीची तपासणी करणे हे अधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे. मात्र, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे, असे म्हटले. १५ दिवसांत परिस्थिती सुधारली नाही, तर शिवसेना आक्रमक भूमिका घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा भोईर यांनी दिला.

पाण्यात अळ्या, शंख
नगरसेविका अमृता मोहरिकर यांनीही प्रशासनावर संताप व्यक्त करत, नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही कुणीही गांभीर्याने दखल घेत नाही. पाण्यात अळ्या, शंख दिसत आहेत आणि इतका घाण वास येतो की ते वापरणेही अशक्य झाले आहे. वेळेवर पाणी नाही, कमी दाबाने पुरवठा आणि अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा वाढला आहे. तातडीने उपाययोजना न झाल्यास महिलांसह आक्रमक आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला.

अंबरनाथ : शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario : पंजाब किंग्सचा सलग पाचवा पराभव! मुंबई इंडियन्सने सर्व गणित बिघडवले; CSK, RR यांना दिली आयती संधी

Gold Import: सोने आयात करणाऱ्यांसाठी मोठा धक्का! ड्युटी-फ्री गोल्डसाठी नवे कडक नियम लागू; प्रति परवान्यावर मर्यादा निश्चित

Anand Paranjape : माझ्यात शिवसेनेचाच डीएनए; माजी खासदार आनंद परांजपे स्वगृही

Mumbai Coastal Road Closed : मुंबई कोस्टल रोड उद्या ५ तास बंद... कसे असतील पर्यायी मार्ग, प्रवास करण्यापूर्वी नक्की वाचा

Nitin Gadkari : अक्कलकोट विधानसभेच्या आणखी दोन महत्त्वाच्या कामाला मंजुरी देण्याची गडकरींची घोषणा; विकास कामात राजकारण न करण्याचे केले आवाहन

SCROLL FOR NEXT