मुंबई

हापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी

CD

उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना
तुर्भे, ता. १४ (बातमीदार) : वाढत्या तापमानामुळे उष्णतेच्या लाटेचे संकट गंभीर होत आहे. या पार्श्वभूमीवर, नवी मुंबई पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी विशेष मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. अद्ययावत राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन आराखड्यांनुसार हे पाऊल उचलण्यात आले आहे.
पालिकेच्या विविध विभागांमध्ये क्षेत्रीय काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शक्यतो दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हात बाहेर जाणे टाळावे. क्षेत्रीय कामासाठी सकाळी ११ पूर्वी किंवा सायंकाळी ४ नंतर बाहेर पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अत्यावश्यक काम असल्यास आवश्यक काळजी घेऊनच बाहेर पडावे, असे निर्देश दिले आहेत. तसेच, विभाग प्रमुखांना कंत्राटी व तात्पुरत्या कामगारांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भरपूर पाणी पिणे, ओआरएस, लिंबूपाणी, ताक यांसारख्या द्रव पदार्थांचे सेवन करणे, हलक्या रंगाचे सैल व सुती कपडे वापरणे. तसेच, बाहेर जाताना टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करावा, असे आवाहन केले आहे. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उष्णतेच्या अलर्ट कालावधीत या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.

कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी विशेष तरतुदी
१ कार्यालयांमध्ये थंड पिण्याच्या पाण्याची आणि प्राथमिक उपचाराची सुविधा उपलब्ध ठेवण्याचे निर्देशही दिले आहेत.
२ चक्कर येणे, मळमळ, डोकेदुखी, जास्त घाम येणे किंवा अशक्तपणा जाणवल्यास तत्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे सांगण्यात आले आहे.
३ कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याची प्रकृती बिघडल्यास संबंधित विभाग प्रमुखांनी तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, असेही आदेशात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lohgad Ketan Agarwal Death Case : पावसात लोहगडावर चेतन चौधरीकडून सीन रिक्रिएशन; केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाच्या तपासाला वेग

Kolhapur Child Death : अवघ्या 4 दिवसांपूर्वीच साजरा केला होता वाढदिवस, खेळता खेळता 4 वर्षांच्या रियांशचा गोबर गॅसच्या टाकीत पडून मृत्यू; साबळेवाडीतील घटनेने हळहळ

सचिन अहिर अपात्र ठरणार की वाचणार? पक्षांतरबंदी कायद्यात नेमकं काय? उपसभापती पद ठरणार कवच

Khadakwasala Dam : खडकवासला धरणसाखळीत जूनमध्ये पावसाची शंभरी

मुंबईत संततधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिराने; अनेक भाग जलमय, ४ दिवस ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT