मुंबई

दोन सराईत महिला चोरट्या जेरबंद

CD

कळवा, ता. १४ (बातमीदार) : बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या अंगावरील दागिने व पर्स चोरी करणाऱ्या दोन सराईत महिला चोरट्यांना कळवा पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून सुमारे ३७ लाख १९ हजार रुपये किमतीचे २५ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
कळव्यातील पारसिक नगर येथे राहणाऱ्या अंजनी सूर्यवंशी या खारेगाव येथून ओझान व्हॅली, पारसिक नगरकडे बसने प्रवास करत होत्या. त्या बसमध्ये उभ्या असताना त्यांच्या आजूबाजूला असलेल्या तीन महिलांनी संगनमत करून त्यांच्या हातातील पिशवी हिसकावून त्यामधील १४ तोळे सोन्याच्या दागिन्यांची पर्स चोरी केली होती. ही घटना ३ सप्टेंबर रोजी घडली होती. याप्रकरणी कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना कळवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत अशाच प्रकारच्या चोरीच्या घटना वारंवार घडत असल्याचे समोर आले. गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार संदीप महाडिक आणि प्रशांत लवटे यांनी तपास करत आरोपी महिलांची माहिती मिळवली.
त्यानुसार पोलिसांनी संगीता पिठकर (वय ४५) आणि सुरेखा गायकवाड (वय ४७) यांना ताब्यात घेत चौकशी केली. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांच्याकडून ३७ लाख १९ हजार रुपये किमतीचे २५ तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. दरम्यान, या दोन्ही महिलांविरोधात यापूर्वीही कळवा, राबोडी, ठाणे नगर आणि नौपाडा पोलिस ठाण्यात विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT