मुंबई

भिवंडीत ४१ हजारांची सायबर फसवणूक

CD

भिवंडी, ता. १५ (बातमीदार) : समाज माध्यमावर मार्केटिंग क्षेत्रात काम करणाऱ्या अंजूरफाटा परिसरातील तरुणाला इन्स्टाग्राम खाते बंद करण्याची धमकी देत ऑनलाइन पद्धतीने ४१ हजार रुपये उकळण्यात आले आहेत. याप्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध सायबर फसवणूक आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, अंजूरफाटा येथील लोटस इमारतीत राहणारा २३ वर्षीय तरुण समाज माध्यमावर मार्केटिंग क्षेत्रात कार्यरत आहे. sukunalG या टेलिग्राम आयडीचा वापर करणाऱ्या अज्ञात व्यक्तीने २४ मार्च ते ८ मे या कालावधीत त्याच्याशी संपर्क साधला होता. या दरम्यान तरुणाच्या इन्स्टाग्राम खात्यावर बनावट ‘स्ट्राइक्स’ टाकण्याची धमकी दिली. तसेच खाते कायमस्वरूपी बंद केले जाईल, अशी भीती दाखवत ऑनलाइन व्यवहारांद्वारे ४१ हजार रुपये उकळल्याची तक्रार करण्यात आली आहे. या धमक्यांमुळे आर्थिक नुकसानासोबतच मानसिक त्रासही सहन करावा लागल्याचे पीडित तरुणाने तक्रारीत नमूद केले आहे. दरम्यान, याप्रकरणी नारपोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलिस निरीक्षक आनंद पाटील या घटनेचा तपास करत आहेत. आरोपीचा टेलिग्राम आयडी, संबंधित ऑनलाइन व्यवहार आणि तांत्रिक पुराव्यांचे विश्लेषण करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfer: राज्यात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या मोठ्या बदल्या; पुणे, नाशिकमध्येही मोठे फेरबदल, कुणाची बदली कुठे?

Who is Akash Maharaj Singh? ऋतुराज संजू, उर्विल यांना बाद करून खिशातून काढला कागद... काय लिहिलंय माहित्येय? Video Viral

ब्युटी पार्लरमध्ये मार्गदर्शन, पुण्यात विशेष कोचिंग अन्... NEET पेपरफुटीचा ‘मास्टरमाईंड’ पी. व्ही. कुलकर्णी नेमका कोण?

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी केला इंडिगो विमानाने प्रवास

आजोबांच्या धाकाने शेणाने जमीन सारवायची माधुरी दीक्षित; मूळ कोकणातली आहे धकधक गर्ल, गावाचं नाव माहितीये?

SCROLL FOR NEXT