गळा आवळून महिलेचा खून
पालघरच्या डहाणू मोडगावमधील घटना
पालघर, ता. १५ ः जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात मोडगाव खोरीपाडा येथे विवाहित महिलेची गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणात कासा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
सुनीता गोवारी (वय ४५) तिचा पती जेठया गोवारीसोबत मोडगाव खोरीपाडा येथे राहत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार (ता. १३) सकाळी जेठया गोवारी कामानिमित्त बाहेर गेले होते. पती घरी नसल्याची संधी साधून आरोपीने झोपडीत प्रवेश केला. त्यानंतर सुनीता गोवारी यांचा गळा आवळून खून करण्यात आला. सकाळी ८ ते रात्री ८.३०च्या दरम्यान ही घटना घडल्याचा अंदाज आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर कासा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर पोलिसांनी दामा खरपडेला (वय ५०, रा. खोरीपाडा, मोडगाव, ता. डहाणू) ताब्यात घेतले. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता २०२३च्या कलम १०३(१) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक विनायक नरळे, उपविभागीय पोलिस अधिकारी समीर मेहेर, कासा पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अमर पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.