मुंबई

काल्हेरमधील वेश्या व्यवसाय रॅकेट उघड

CD

भिवंडी, ता. १५ (बातमीदार) : तालुक्यातील काल्हेर परिसरातील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसाय रॅकेटवर ठाणे शहर पोलिसांच्या मानवी तस्करी विरोधी पथकाने छापा टाकत एका महिला दलालाला अटक केली. या कारवाईत दोन महिलांची सुटका करत रोख रक्कम आणि मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, ठाणे-भिवंडी मार्गावरील काल्हेर गावाच्या हद्दीतील ‘हॉटेल वंश किचन फॅमिली रेस्टॉरंट अँड बार’ येथे मंगळवारी (ता. १२) सायंकाळी ४.३५ वाजता ही कारवाई करण्यात आली. तपासादरम्यान अटक महिला दलाल पीडितांना पैशांचे प्रलोभन दाखवून वेश्या व्यवसायात ढकलत असल्याचे समोर आले आहे. संबंधित महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक अडचणींचा गैरफायदा घेत ग्राहकांसोबत लैंगिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला जात होता. छाप्यात पोलिसांनी चार हजार ४७० रुपये रोख रक्कम आणि एक मोबाईल जप्त केला. याप्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक विजय रामलाल पाटील यांच्या तक्रारीवरून कारवाई केली असून पोलिस निरीक्षक कदम या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात AI आणि ग्रीन डेटा सेंटर पार्कला मंजुरी! AI कंप्यूट हब उभारणार; फडणवीस सरकारचा मेगा प्रकल्प

WTC POINT TABLE: ICCची पाकिस्तानवर मोठी कारवाई! बांगलादेशकडून हरले, त्यात नवीन संकट; भारताला आव्हान द्यायला गेले अन् आपटले

Pune News : नाव देताना विरोधीपक्ष होणार बेदखल; चारऐवजी तीन नगरसेवकांच्या स्वाक्षरीने देता येणार नाव

Katraj News : कात्रज उड्डाणपूल उतरण्याचा मार्ग अखेर मोकळा; कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरण प्रकल्पाला गती

चीनहून परतताच फोन-लॅपटॉप फेकले; डोनाल्ड ट्रम्प यांच्या चीन दौऱ्यानंतर अमेरिकन शिष्टमंडळाचा निर्णय, कारण काय?

SCROLL FOR NEXT