मुंबई

करवसुली नियमित; सुविधा मात्र शून्य

CD

टिटवाळा, ता. १५ (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महापालिका नागरिकांकडून घरपट्टीसह रस्ता, वृक्ष आणि मलप्रवाह सुविधा लाभ कर नियमित वसूल करत असताना टिटवाळा परिसरातील रस्त्यांची मात्र अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. यावर नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. विशेषतः टिटवाळा रेल्वे स्थानकाबाहेरील मुख्य रस्ता आणि विद्यामंदिर शाळेजवळील मार्ग मोठमोठ्या खड्ड्यांनी व्यापला आहे. वाहनचालक, रिक्षाचालक, पादचारी आणि विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी वाढत असून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः विद्यामंदिर शाळेजवळील रस्ता धोकादायक बनल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होत आहे. घरपट्टीमध्ये रस्ता कर आकारला जातो, मग रस्त्यांची दुरुस्ती का होत नाही? मलप्रवाह सुविधा लाभ कर आकारूनही अनेक भागांत सांडपाणी वाहिनीची सुविधा उपलब्ध नाही, अशी संतप्त भावना नागरिक व्यक्त करत आहेत. याशिवाय, वाहन खरेदीवेळी सरकार रोड टॅक्स आकारते, मग नागरिकांकडून घेतला जाणारा हा निधी नेमका कुठे खर्च होतो, असा सवालही उपस्थित केला जात आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, टिटवाळा परिसरातील काही चाळींमध्ये आजही अधिकृत गटारांची सुविधा नाही. मुख्य सांडपाणी वाहिनी परिसरात असतानाही संबंधित चाळींना जोडणी दिली नाही. एकीकडे मलप्रवाह सुविधा लाभ कर नियमित वसूल केला जातो, तर दुसरीकडे मूलभूत सुविधा नाही. अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाकडून केवळ तात्पुरत्या उपाययोजना केल्या जातात. रस्ते दुरुस्ती, स्वच्छता आणि सांडपाण्यासारख्या मूलभूत प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे.

जन आंदोलनाचा इशारा
टिटवाळ्यातील सर्व खराब रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी. ज्या भागांत गटार आणि सांडपाणी सुविधा नाहीत, तेथे त्वरित उपलब्ध करून द्याव्यात; अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे.


टिटवाळा : शहरात ठिकठिकाणी खड्डे पडले असून रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, ठाकरेंनी ऐनवेळी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

MNS: मनसेची कल्याण-डोंबिवलीत मोठी मोर्चेबांधणी; हर्षद पाटील शहराध्यक्ष, नव्या टीमची घोषणा

Kolhapur Girl Death : हृदयद्रावक! झोका खेळताना ओढणीचा फास लागून सातवीतील विद्यार्थिनीचा मृत्यू; संसाराला हातभार लावणाऱ्या मोठ्या मुलीचा दुर्दैवी शेवट

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

SCROLL FOR NEXT