मुंबई

रेल्वे रुळ बांधकामादरम्यान कामगाराचा मृत्यू

CD

भिवंडी, ता. १५ (बातमीदार) : भिवंडी रेल्वे स्थानकाजवळ सुरू असलेल्या रेल्वे रुळ बांधकामादरम्यान एका कामगाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीतील निष्काळजीमुळे संरक्षक भिंत कोसळून हा अपघात घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन अधिकाऱ्यांविरुद्ध बुधवारी (ता. १३) गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, १६ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास भिवंडी रेल्वे स्थानकाजवळ नवीन रेल्वे रुळ बांधण्याचे काम सुरू होते. त्यावेळी संरक्षक भिंतीचे बांधकाम सुरू असताना अचानक सिमेंटची भिंत कोसळून जयराज कामालीया (वय २२) या कामगाराचा जागीच मृत्यू झाला. तपासादरम्यान, बांधकामस्थळी कामगारांच्या सुरक्षेची जबाबदारी ‘टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड’ आणि ‘माया एंटरप्राइजेस’ या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांवर असल्याचे समोर आले. मात्र, सुरक्षा व्यवस्थापक नरेंद्र कुमार राधामोल साहू, सुरक्षा पर्यवेक्षक यतेश ब्रिजगोपाल सास्वत आणि अभियंता अनिल कुमार गोरख प्रसाद सिंग यांनी सुरक्षा मानकांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सुरुवातीला या घटनेची अपघाती मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती. त्यानंतर सखोल तपास पूर्ण झाल्यानंतर कर्मचारी सोनाली विकम पाटील यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे नारपोली पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक भारत नवले करत आहे. संबंधित आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfer: राज्यात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या मोठ्या बदल्या; पुणे, नाशिकमध्येही मोठे फेरबदल, कुणाची बदली कुठे?

Who is Akash Maharaj Singh? ऋतुराज संजू, उर्विल यांना बाद करून खिशातून काढला कागद... काय लिहिलंय माहित्येय? Video Viral

ब्युटी पार्लरमध्ये मार्गदर्शन, पुण्यात विशेष कोचिंग अन्... NEET पेपरफुटीचा ‘मास्टरमाईंड’ पी. व्ही. कुलकर्णी नेमका कोण?

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी केला इंडिगो विमानाने प्रवास

आजोबांच्या धाकाने शेणाने जमीन सारवायची माधुरी दीक्षित; मूळ कोकणातली आहे धकधक गर्ल, गावाचं नाव माहितीये?

SCROLL FOR NEXT