मुंबई

भिवंडीत टँकरच्या धडकेत महिलेचा मृत्यू

CD

भिवंडी, ता. १५ (बातमीदार) : भिवंडीतील ओवळी गाव परिसरात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या एका महिलेचा टँकरच्या धडकेने मृत्यू झाला. अपघातानंतर टँकरचालक घटनास्थळावरून फरार झाला असून, नारपोली पोलिसांनी अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, लोकमान्यनगर परिसरात राहणारे विनोद जाधव (वय ३४) हे बुधवारी (ता. १३) सायंकाळी ५.३० वाजता पत्नी रोहिणी (वय २५)सह स्कूटरवरून (एमएच ०४ एमएल ९४१३) दुचाकीवरून जात होते. हे दाम्पत्य सोलापूर चाळीकडून ओवळी खिंड, मोठागाव मार्गाने जाताना मागून भरधाव आलेल्या टँकरने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेनंतर टँकरचे मागील चाक रोहिणीच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालकाने जखमींना मदत न करता पलायन केल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात टँकरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चालकाचा शोध घेण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shocking: जर्मनीचा खेळ खल्लास... पॅराग्वेचा पेनल्टी शूट आऊटमध्ये रोमहर्षक विजय, Fifa World Cup स्पर्धेतून माजी विजेते बाहेर

BRA vs JPN World Cup 2026: व्हॉट अ मॅच... ब्राझीलने शेवटच्या मिनिटाला मिळवला थरारक विजय, जपानच्या लढाऊवृत्तीचे जगभरात कौतुक

NCP finance portfolio: अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर जय पवारांचा दावा

Raigad Journalists Protest: पत्रकारांना जिवे मारण्याच्या धमकीप्रकरणी रायगड पत्रकार संतप्त; खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी

Aashadhi Wari Restrictions: आषाढी वारीत ४ ते ९ जुलैदरम्यान आळंदीत विवाह, साखरपुडा बंद; पोलिसांकडून धर्मशाळा व मंगल कार्यालयांना स्पष्ट सूचना

SCROLL FOR NEXT