मुंबई

‘एचपीव्ही’ लसीकरणासाठी पुढाकार घ्या

CD

वज्रेश्वरी, ता. १५ (बातमीदार) : जिल्ह्यासह ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींना भविष्यात गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळावे, यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. १४ वर्षे पूर्ण झालेल्या आणि १५ वर्षे पूर्ण न झालेल्या सर्व मुलींना सरकारमार्फत ही लस मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. पालकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता मुलींचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
भारतात महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगांमध्ये गर्भाशय मुखाचा कर्करोग हा दुसऱ्या क्रमांकाचा गंभीर आजार मानला जातो. २०२४च्या अहवालानुसार, देशात दरवर्षी ७८ हजारांहून अधिक महिलांना याचे निदान होते, तर ४२ हजारांहून अधिकांचा मृत्यू होतो. ‘एचपीव्ही’ लसीकरणामुळे या कर्करोगास कारणीभूत ठरणाऱ्या विषाणूपासून संरक्षण मिळून भविष्यातील धोका मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होत असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार या लशीचा प्रजननक्षमतेवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. भारत सरकारकडून दिली जाणारी ‘क्वाड्रीव्हॅलंट एचपीव्ही’ लस एकाच डोसमध्ये प्रभावी संरक्षण देते. मुलगी मासिक पाळीत असली तरीही ही लस सुरक्षितपणे दिली जाऊ शकते, असेही विभागाने नमूद केले आहे.
जिल्ह्यातील शाळा, आरोग्य केंद्रे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून प्रत्येक पात्र मुलीपर्यंत लस पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. पालकांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन आपल्या मुलींचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT