मुंबई

महापालिकेच्या आर्थिक स्थितीची श्वेतपत्रिका जाहीर करा

CD

उल्हासनगर, ता. १५ (बातमीदार) : उल्हासनगर महापालिकेच्या आर्थिक स्थितीबाबत नागरिक, करदाते आणि विविध घटकांमध्ये वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर सविस्तर आर्थिक श्वेतपत्रिका तातडीने प्रकाशित करावी, अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांना निवेदन सादर केले. यावेळी जिल्हाध्यक्षा सीमा आहूजा उपस्थित होत्या.

महापालिकेच्या महसूल व खर्चाचा संपूर्ण तपशील नागरिकांसमोर पारदर्शक मांडण्यात यावा. तसेच श्वेतपत्रिकेमध्ये घरपट्टी, मालमत्ता कर, पाणीपट्टी, परवाना शुल्क, थकीत वसुली, महसूल वसुलीची कार्यक्षमता, कर्मचारी वेतन, निवृत्तीवेतन, पायाभूत सुविधा खर्च, विभागनिहाय खर्च, आर्थिक तूट, कर्जबाजारीपणा, व्याज दायित्वे आणि परतफेडीचे वेळापत्रक यांचा समावेश असावा, असे निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी श्वेतपत्रिका प्रकाशित करण्यासाठी प्रशासन स्तरावर आवश्यक प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती तपासे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उद्योगपती महेश आहूजा, विकास शिअर, विनोद पारे, इम्रान खान, वनिता भिडे, पायल मोर्या, संजय साळवे, मिलिंद, आरोश भिडे, वैष्णवी कांबळे आणि सुमन कानू आदी उपस्थित होते.

कारवाईची माहिती जाहीर करा
पाणी व वीजबिलांची थकबाकी, कंत्राटदारांची देणी, मंजूर विकासकामांची स्थिती, शासनाकडून प्राप्त निधी, निधी वापर प्रमाणपत्रे, प्रलंबित लेखापरीक्षण अहवाल, आर्थिक अनियमितता तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर करण्यात आलेल्या कारवाईची माहिती जाहीर करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

नागरिकांचा अधिकार
 शहरातील नागरिकांना त्यांच्या महापालिकेची खरी आर्थिक स्थिती जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही सुशासनाची मूलभूत तत्त्वे आहेत, असे मत महेश तपासे यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT