बेलापूर येथे प्रकल्पग्रस्तांच्या घरांसाठी आज बैठक
जुईनगर, ता. १५ (बातमीदार) : नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांना कायमस्वरूपी मान्यता मिळावी, यासाठी शासनाने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयाच्या पार्श्वभूमीवर एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक आमदार मंदा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी (ता. १६) सायंकाळी ४ वाजता वारकरी भवन, पहिला मजला, सेक्टर-३, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथे होणार आहे. बैठकीत प्रकल्पग्रस्त नागरिकांच्या घरांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.
नवी मुंबई परिसरातील अनेक प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांनी गेल्या अनेक वर्षांपासून निवाऱ्याच्या गरजेतून घरे बांधली आहेत. या घरांना कायदेशीर आणि कायमस्वरूपी मान्यता मिळावी, यासाठी शासन स्तरावर महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, त्या संदर्भातील माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि पुढील कार्यवाहीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या घरांच्या नियमितीकरणाची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, शासनाच्या अटी व नियम तसेच नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे नवी मुंबईतील सर्व संबंधित प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.