मुंबई

घणसोलीतील सिम्प्लेक्स प्रकल्पाविरोधात महापालिकेची पोलिसांत तक्रार

CD

घणसोलीत सिम्प्लेक्स प्रकल्पावर पालिकेची कठोर कारवाई
अनधिकृत बांधकामप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची शिफारस; स्थानिकांमध्ये खळबळ
तुर्भे, ता. १५ (बातमीदार) : घणसोली सेक्टर-७ परिसरातील सिम्प्लेक्स प्रकल्पामधील काही सहकारी गृहनिर्माण संस्थांविरोधात नवी मुंबई महापालिकेने कठोर भूमिका घेतल्याचे समोर आले आहे. अनधिकृत बांधकाम केल्याचा ठपका ठेवत महापालिकेच्या घणसोली विभाग कार्यालयाने रबाळे पोलिस ठाण्याकडे अधिकृत तक्रार पाठवून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली आहे. या कारवाईमुळे रहिवाशांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महापालिकेच्या पत्रानुसार, कै. अण्णासाहेब पाटील को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी आणि ओम साईधाम को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी, सिम्प्लेक्स येथे महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम अंतर्गत आवश्यक परवानग्या न घेता बांधकाम करण्यात आल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी महापालिकेकडून संबंधितांना यापूर्वीच एमआरटीपी कायद्यानुसार नोटीस बजावण्यात आली आहे. हे अनधिकृत बांधकाम काढून टाकण्याबाबत किंवा नियमांनुसार कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, नोटीस दिल्यानंतरही परिस्थितीत कोणताही बदल न झाल्याचे महापालिकेने आपल्या पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे आता पुढील टप्प्यात पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महापालिकेने रबाळे पोलिस ठाण्याकडे पाठविलेल्या पत्रासोबत पाहणी अहवाल, पंचनामा, नोटीसची प्रत आणि अन्य संबंधित कागदपत्रे जोडली असल्याची माहिती मिळत आहे.

पारदर्शक चौकशीची मागणी
सिम्प्लेक्स प्रकल्पातील रहिवाशांमध्ये या घडामोडींमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. भविष्यात इमारतींवर तोडक कारवाई होणार का, याबाबत विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. स्थानिक नागरिकांकडूनही या प्रकरणात पारदर्शक चौकशीची मागणी होत आहे. काही रहिवाशांनी विकसक आणि संबंधित संस्थांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, अधिकृत मंजुरीशिवाय बांधकामे कशी झाली, याबाबत प्रशासनाने सखोल तपास करावा, अशी मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfer: राज्यात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या मोठ्या बदल्या; पुणे, नाशिकमध्येही मोठे फेरबदल, कुणाची बदली कुठे?

Who is Akash Maharaj Singh? ऋतुराज संजू, उर्विल यांना बाद करून खिशातून काढला कागद... काय लिहिलंय माहित्येय? Video Viral

ब्युटी पार्लरमध्ये मार्गदर्शन, पुण्यात विशेष कोचिंग अन्... NEET पेपरफुटीचा ‘मास्टरमाईंड’ पी. व्ही. कुलकर्णी नेमका कोण?

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी केला इंडिगो विमानाने प्रवास

आजोबांच्या धाकाने शेणाने जमीन सारवायची माधुरी दीक्षित; मूळ कोकणातली आहे धकधक गर्ल, गावाचं नाव माहितीये?

SCROLL FOR NEXT