मुंबई

हिंदू नववर्ष शोभायात्रेच्या स्पर्धकांचा सन्मान

CD

हिंदू नववर्ष शोभायात्रेच्या स्पर्धकांचा सन्मान
वाशी ता. १५ (बातमीदार): सौरभ ऋषीकांत शिंदे फाउंडेशन’ यांच्या वतीने घणसोली येथे आयोजित करण्यात आलेल्या हिंदू नववर्ष शोभायात्रेच्या बक्षीस वितरण समारंभाचा सोहळा नुकताच घणसोली येथील ओम साई धाम सोसायटी, सिंप्लेक्स येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला नागरिक, कार्यकर्ते आणि स्पर्धकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती.
या सोहळ्याचे प्रमुख मान्यवर म्हणून नगरसेवक सौरभ शिंदे आणि नव्या शिंदे हे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते शोभायात्रेत उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या स्पर्धकांचा, कलाकारांचा आणि विविध मंडळांचा सन्मानचिन्ह व पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
हिंदू संस्कृती, परंपरा आणि सामाजिक ऐक्य जपण्यासाठी अशा सांस्कृतिक उपक्रमांची गरज असल्याचे मत यावेळी सौरभ शिंदे यांनी व्यक्त केले. शोभायात्रेत सहभागी झालेल्या सर्व कलाकारांनी आपल्या कला, वेशभूषा आणि उत्साहपूर्ण सहभागातून नागरिकांची मने जिंकली. त्यामुळे या सर्वांचा गौरव करणे ही आपली जबाबदारी असल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात विजेत्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांचे आणि उपस्थित नागरिकांचे आभार मानण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात मालमत्ता वादांवर लगाम लागणार! मोजणीशिवाय आता होणार नाही म्युटेशन; फ्लॅटधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार

Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! संजय दराडे पुण्याचे सह पोलिस आयुक्त तर गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी तेजस्वी सातपुते

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्स एका फटक्यात तीन संघांचा कार्यक्रम करणार; एक गणित ज्याने भल्याभल्यांची झोप उडणार

Mumbai News : गुगल बरोबर ॲपललाही नोटीस; बाईक टॅक्सी सेवेला झटका, राज्य सायबर विभागाची मोठी कारवाई

Modi UAE Visit: तेल, LNG-LPG आणि ५ अब्ज डॉलर गुंतवणूक अन्... पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यूएई दौऱ्यातून भारताला काय मिळालं?

SCROLL FOR NEXT