मुंबई

कॅन्सरग्रस्तांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दिलासा

CD

कॅन्सरग्रस्तांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दिलासा
अलिबाग, ता. १५ (वार्ताहर) : रायगड जिल्ह्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून १ मे २०२५ ते ६ एप्रिल २०२६ या कालावधीत १३ कर्करोगग्रस्त रुग्णांना आर्थिक मदत देण्यात आली आहे. या योजनेमुळे गंभीर आजारांवरील महागड्या उपचारांसाठी सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यातील एकूण २५ रुग्णांचे अर्ज पाठविण्यात आले होते. त्यापैकी १९ अर्ज शस्त्रक्रियेसाठी तर ६ अर्ज केमोथेरपीसाठी होते. यातील १३ रुग्णांना प्रत्यक्ष लाभ मिळून त्यांना एकूण १० लाख ८० हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला.
कॅन्सर, हृदयविकार व किडनीच्या आजारांवरील उपचार खर्चिक असल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी ही योजना महत्त्वाची ठरत आहे. वार्षिक उत्पन्न १.६० लाखांपर्यंत असलेल्या पात्र रुग्णांना या निधीतून मदत दिली जाते. जिल्हास्तरावर सहाय्यता कक्ष उपलब्ध झाल्याने अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Resolution Controversy : गोकुळ निवडणुकीत पात्र ठराव ४४४८, तर नेत्यांनी दाखल केले तब्बल ७४०४ ठराव, फुगलेला आकडा कुणाचा?

Viral Video: असं कोण वागतं का? वैभव सूर्यवंशीला सराव करताना चेहरा लपवावा लागला... प्रेक्षकांनी नेमकं असं काय केलं?

Tukaram Mundhe Pattern : तुम्ही खाताय ते पनीर खरंच शुद्ध आहे? रत्नागिरीत 127 ठिकाणे छापे, 77 संशयास्पद नमुने जप्त; मुंढे पॅटर्नच्या भीतीने नामांकित कंपन्यांचे एजंट फरार

Gold Rate Today: जुलैच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर कोसळले! महिन्याभरात 17 हजार तर उच्चांकापासून 40 हजारांनी स्वस्त; पाहा ताजा भाव

Nivali Ghat Landslide : निवळी घाटात दरड कोसळली! ओंडका थेट रस्त्यावर आल्याने दुचाकीस्वार जखमी; कोकणात मुसळधार, पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे...

SCROLL FOR NEXT