मुंबई

ठाणे रेल्वे स्थानकावर पोलिस शिपायाचा मोबाईल लांबवला

CD

ठाणे रेल्वे स्थानकावर पोलिस शिपायाचा मोबाईल लांबवला
ठाणे, ता. १५ : ठाणे रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक सातवर गर्दीचा फायदा घेत अनोळखी चोरट्याने मुंबई पोलिस दलातील एका पोलिस शिपायाचा ४२ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन लंपास केल्याची घटना गुरुवारी घडली. याप्रकरणी ठाणे रेल्वे पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवी मुंबईत राहणारे सोमेश्वर गुरुपायाय स्वामी (वय २९) हे मुंबई पोलिस दलात पोलिस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. त्यांना १४ मे रोजी मित्राच्या लग्नासाठी चाळीसगाव येथे जायचे असल्याने ते कोपरखैराणे येथून लोकलने ठाणे रेल्वे स्थानकावर आले होते. ते फलाट क्रमांक ७ वर गोरखपूर एक्स्प्रेसची वाट पाहत उभे होते. याचदरम्यान, काशी एक्स्प्रेस फलाटावर येत असताना त्यांनी मोबाईल पँटच्या उजव्या खिशात ठेवून जनरल डब्यात गर्दीतून प्रवेश केला. मात्र, डब्यात चढल्यानंतर मोबाईल तपासला असता तो मिळून आला नाही. याप्रकरणी ठाणे रेल्वे पोलिस ठाण्यात मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात मालमत्ता वादांवर लगाम लागणार! मोजणीशिवाय आता होणार नाही म्युटेशन; फ्लॅटधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार

Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! संजय दराडे पुण्याचे सह पोलिस आयुक्त तर गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी तेजस्वी सातपुते

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्स एका फटक्यात तीन संघांचा कार्यक्रम करणार; एक गणित ज्याने भल्याभल्यांची झोप उडणार

Mumbai News : गुगल बरोबर ॲपललाही नोटीस; बाईक टॅक्सी सेवेला झटका, राज्य सायबर विभागाची मोठी कारवाई

Modi UAE Visit: तेल, LNG-LPG आणि ५ अब्ज डॉलर गुंतवणूक अन्... पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यूएई दौऱ्यातून भारताला काय मिळालं?

SCROLL FOR NEXT