मुरबाड (वार्ताहर) : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत तालुकास्तरीय पडताळणी समितीचा दौरा दहिगाव-चाफे ग्रामपंचायतीत पार पडला. या दौऱ्यात ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांची आणि योजनांची पाहणी करण्यात आली. समितीने सुशासनयुक्त ग्रामपंचायत, सक्षम पंचायत, जलसमृद्ध व स्वच्छ-हरित गाव, मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण, गावपातळीवरील संस्था सक्षमीकरण, उपजीविका विकास, सामाजिक न्याय; तसेच लोकसहभाग आणि श्रमदानातून उभारलेल्या उपक्रमांची पाहणी केली. याशिवाय ग्रामपंचायतीने राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचाही आढावा घेण्यात आला. दहिगाव-चाफे ग्रामपंचायतीने विविध क्षेत्रांत केलेल्या कामांबद्दल समितीने समाधान व्यक्त करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. समितीत डी. जी. जाधव (गटविकास अधिकारी, पंचायत समिती भुसावळ), गौतम वाडे (विस्तार अधिकारी), संजय भारंबे (ग्रामपंचायत अधिकारी), सुनील मोरे (केंद्रप्रमुख), सी. पी. पाटील (आरोग्य सहाय्यक) आणि हर्षल येवले (डाटा ऑपरेटर) यांचा समावेश होता. या वेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, मुख्याध्यापक, कर्मचारी, आशा स्वयंसेविका, सीआरपी, अंगणवाडी सेविका तसेच गावपातळीवरील कर्मचारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.