मुंबई

धारावीतील कचरा वर्गीकरण केंद्रास पालिका अधिकाऱ्यांची भेट

CD

कचरा वर्गीकरण केंद्रास पालिका अधिकाऱ्यांची भेट

धारावी, ता. १५ (बातमीदार) : मुंबईत अनेक ठिकाणी पालिकेतर्फे कचऱ्याचे वर्गीकरण करून ओला व सुका कचरा वेगळा केला जातो. या ओला व सुका कचऱ्यावर प्रक्रिया करून पर्यावरणाचा ऱ्हास कमी करण्याचा प्रयत्न गेली अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. असेच एक केंद्र धारावीत चालवले जात आहे. त्या केंद्रास गुरुवारी (ता. १४) ग/उत्तर प्रभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली.
पालिकेच्या ग/उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश देसाई यांनी धारावी मुख्य रस्त्यावरील नवरंग कंपाउंड येथे संगम प्रतिष्ठान संचालित सुका कचरा वर्गीकरण केंद्रास भेट देऊन संपूर्ण परिसराची पाहणी केली. मुंबई मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन खात्याचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच अद्ययावत यंत्रणांचा वापर करून क्षेपणभूमीवर जाणारा जास्तीत जास्त कचरा ‘ड्राय वेस्ट सेंटर’वर आडवण्यासाठी आणि तो पुनर्वापर करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. धारावीसारख्या भागात अशा वर्गीकरण केंद्राची अत्यंत आवश्यकता होती. ती गरज समाजिक संस्था व पालिका हातात हात घालून चालवत असल्याबद्दल अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

या वेळी विभागीय कार्यकारी अभियंता राजेश यादव, सहाय्यक अभियंता घनकचरा व्यवस्थापन किरण पाटील यांनी परीक्षण विभागाच्या टीमसहित घनकचरा व्यवस्थापन खात्याची संपूर्ण टीम उपस्थित होती. संगम प्रतिष्ठानच्या सचिव ॲड. कोमल तानाजी घाग तसेच संगम प्रतिष्ठानच्या पथकाने सहाय्यक आयुक्तांना या प्रकल्पाची व्याप्ती वाढविणे आणि मुंबईमधील एक मॉडल ड्राय वेस्ट सेंटर बनविण्याबाबत एस. ओ. पी. तयार केली असून, याबाबत भेटीसाठी वेळ देण्यासाठी विनंती करण्यात आली आणि त्यांनी ती मान्यही केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayodhya Ram Mandir Theft : राम मंदिरातील योग केंद्रात काळाबाजार? रहस्यमय पेटीवर QR कोड; अयोध्या राम मंदिर चोरी प्रकरणात धक्कादायक खुलासे

Tukaram Mundhe FDA Raids : तुकाराम मुंढे 'इफेक्ट'! बाजारपेठेतून सुटे तेल गायब, डेअरी व्यावसायिकही अस्वस्थ; अवघ्या 15 दिवसांत महाराष्ट्रातील भेसळखोरांचे धाबे दणाणले

Agriculture Day 2026: नेमका कधी आणि कसा सुरू झाला 'महाराष्ट्र कृषी दिन' ?

IND vs ENG 1st T20I : वैभव सूर्यवंशीचे पदार्पण नाहीच, संजू सॅमसन संघात कायम; पहिल्या ट्वेंटी-२०साठी भारताची संभाव्य Playing XI

Koyna Dam Water Level : ...अखेर दिलासादायक बातमी! तळ गाठणारे कोयना धरण पुन्हा भरणार; महाबळेश्वर-नवजातील पावसाने पाणीसाठ्यात मोठी वाढ, पाहा ताजी आकडेवारी

SCROLL FOR NEXT