मुंबई

रेल्वे कारशेडच्या भरावामुळे पूरधोक्याची भीती

CD

रेल्वे कारशेडच्या भरावामुळे पूरधोक्याची भीती
ग्रामस्थांचा तहसील कार्यालयावर मोर्चा
कर्जत, ता. १५ (बातमीदार) : कर्जत तालुक्यातील भिवपुरी रोड स्थानक परिसरात सुरू असलेल्या एमआरव्हीसीच्या रेल्वे कारशेड प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या सुमारे सहा फूट उंच मातीच्या भरावामुळे बेंडसे, वावे, भातगाव, बार्डी आणि कोषाणेवाडी या गावांमध्ये यंदाच्या पावसाळ्यात गंभीर पूरस्थिती निर्माण होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (ता. १५) कर्जत तहसील कार्यालयावर ग्रामस्थांनी मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन दिले.
मोर्चात शेतकरी, महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ‘कारशेडचा भराव, पुराचा कहर’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. पर्यावरण, शेती आणि मानवी जीविताचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. भरावामुळे उल्हास नदीच्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बदलून पूराचे पाणी गावांमध्ये शिरू शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली.
या वेळी तहसीलदार धनंजय जाधव, पाटबंधारे विभागाचे संदेश मेंगाळ, रेल्वेचे अधिकारी गणेश दांडे, उपसभापती चित्रा ठाकरे आदी उपस्थित होते. ग्रामस्थांच्या वतीने अविनाश कडू यांनी ठाम भूमिका मांडत, संभाव्य नुकसान टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. बैठकीत तज्ज्ञांच्या अहवालानुसार आवश्यक उपाययोजना करण्याचे आणि परिस्थितीचे पूर्ण मूल्यमापन होईपर्यंत कारशेडचे काम तात्पुरते स्थगित ठेवण्याचे आश्वासन रेल्वे प्रशासनाने दिले.

चौकट
बेकायदा उत्खनन
रेल्वेच्या माध्यमातून सुरू असलेल्या या भरावा कामासाठी मोठ्या प्रमाणात बेकायदा उत्खनन सुरू असल्याचेसुद्धा निदर्शनास आले आहे. तसेच शासनाचा कोट्यवधीचा रॉयल्टी महसूल बुडवून ठेकेदार काम करीत असल्याचेसुद्धा अनेकदा समोर आले आहे. हा भराव करताना पाटबंधारे विभागाने डोळेझाक केल्याने पूर नियंत्रण रेषा बदलत आहे आणि त्यामुळेच संबंधित गावे पाण्याखाली येऊ शकतात, अशी भीती व्यक्त करण्यात आली.

कोट
ग्रामस्थांनी व्यक्त केलेल्या पूरधोक्याच्या चिंतेची गंभीर दखल घेतली आहे. रेल्वे, पाटबंधारे विभाग आणि ग्रामस्थांची संयुक्त बैठक घेण्यात आली. तज्ज्ञांच्या अहवालानुसार आवश्यक उपाययोजना केल्या जातील. तोपर्यंत संबंधित काम तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्याचे आश्वासन रेल्वे अधिकाऱ्यांनी दिले आहे.
– धनंजय जाधव, तहसीलदार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT