मुंबई

वर्तकनगरमध्ये अवैध दारू विक्री करणारा ताब्यात

CD

वर्तकनगरमध्ये अवैध दारूविक्री करणारा ताब्यात
ठाणे : वर्तकनगर पोलिसांनी शास्त्रीनगर परिसरात गस्तीदरम्यान अवैध दारूविक्री करणाऱ्या गणेश पाटकर (३८) याला ताब्यात घेतले. १३ मे रोजी दुपारी १२.२५ वाजण्याच्या सुमारास शास्त्रीनगर, वर्तकनगर येथील हत्ती पूल परिसरात सनशाईन मोटर्ससमोरील सार्वजनिक शौचालयाजवळ संशयित इसम उभा असल्याचे पोलिसांना दिसले.
पोलिसांनी चौकशी केली असता तो पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. त्याला पकडून झडती घेतली असता पांढऱ्या पिशवीत देशी दारूच्या ९० मिलीच्या सहा बाटल्या आढळल्या. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिठबंदर खाडीत पडलेल्या व्यक्तीचा दुसऱ्या दिवशीही शोध सुरू
ठाणे : कोपरी येथील मिठबंदर खाडीत पडलेल्या दत्ता लहू शिनलकर या ५२ वर्षीय व्यक्तीचा शोध दुसऱ्या दिवशीही सुरू असून, आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दल आणि स्थानिक मच्छीमारांकडून संयुक्त शोधमोहीम राबविण्यात येत आहे.
आपत्ती व्यवस्थापन कक्षाला १४ मे रोजी सायंकाळी ६.३९ वाजता मिठबंदर खाडी येथील गणपती विसर्जन घाट येथे व्यक्ती पडल्याची माहिती मिळाली. सीसीटीव्ही फुटेजनुसार ते १३ मे रोजी दुपारी ११.४५ वाजता विसर्जन घाट परिसरात जाताना दिसले होते. गुरुवारी अपुरा प्रकाश आणि खाडीतील तीव्र प्रवाहामुळे शोधकार्य थांबवण्यात आले होते. मात्र शुक्रवारी सकाळपासून आपत्ती व्यवस्थापन, ठाणे अग्निशमन दल, आपत्ती प्रतिसाद पथक आणि स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने बोटीच्या सहाय्याने सुमारे तीन तासांपासून शोधमोहीम सुरू आहे.

ड्युटीवरील बुकिंग क्लर्क दारूच्या नशेत
ठाणे : मुंब्रा रेल्वे स्थानक येथे ड्युटीवर असताना दारूच्या नशेत आरडाओरडा करून सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या सोनुसिंग रमेशसिंग भदोरिया (४४) या बुकिंग क्लर्कवर रेल्वे पोलिसांनी कारवाई केली. १४ मे रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास ठाणे रेल्वे पोलिसांचे पथक मुंब्रा रेल्वे स्थानकावर गस्त घालत असताना तिकीट काउंटरसमोर ऑन-ड्युटी बुकिंग क्लर्क मद्यधुंद अवस्थेत गैरवर्तन करताना आढळला. तपासणीत ते अल्कोहोलच्या प्रभावाखाली असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम आणि महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गांजा सेवन करणाऱ्यांवर कारवाई
ठाणे : ठाणे रेल्वे पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसरात गांजा सेवन करणाऱ्या दोघांविरुद्ध कारवाई केली. १३ मे रोजी गुन्हे प्रतिबंधक गस्तीदरम्यान फलाट क्रमांक २ वरील कल्याण बाजूकडील एसटी गेटजवळील पुलाखाली मुस्ताक अक्रम खान ऊर्फ सिराज (३०) हा चिलीममधून गांजा ओढताना आढळला. त्याच दिवशी सायंकाळी ४.४५ वाजता याच परिसरात संस्कार भुपत चौहान (२२, रा. विटावा, ठाणे) हाही गांजा सेवन करताना पकडला गेला. दोघांकडून चिलीम, जळालेला गांजा व अन्य साहित्य जप्त करण्यात आले असून, एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात AI आणि ग्रीन डेटा सेंटर पार्कला मंजुरी! AI कंप्यूट हब उभारणार; फडणवीस सरकारचा मेगा प्रकल्प

WTC POINT TABLE: ICCची पाकिस्तानवर मोठी कारवाई! बांगलादेशकडून हरले, त्यात नवीन संकट; भारताला आव्हान द्यायला गेले अन् आपटले

Pune News : नाव देताना विरोधीपक्ष होणार बेदखल; चारऐवजी तीन नगरसेवकांच्या स्वाक्षरीने देता येणार नाव

Katraj News : कात्रज उड्डाणपूल उतरण्याचा मार्ग अखेर मोकळा; कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरण प्रकल्पाला गती

चीनहून परतताच फोन-लॅपटॉप फेकले; डोनाल्ड ट्रम्प यांच्या चीन दौऱ्यानंतर अमेरिकन शिष्टमंडळाचा निर्णय, कारण काय?

SCROLL FOR NEXT