मुंबई

रोह्याचे नगरसेवक सहकुटुंब इंदौर येथे अभ्यास दोऱ्यावर

CD

रोह्याचे नगरसेवक सहकुटुंब इंदौर येथे अभ्यास दोऱ्यावर
रोहा, ता.१५ (बातमीदार) : रोहा अष्टमी नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या विशेष सहकार्याने नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगराध्यक्ष, सर्व सभापती, नगरसेवक व नगरसेविका आपल्या कुटुंबा सहित मध्य प्रदेशातील इंदौर येथे अभ्यास दौऱ्यावर आहेत. या अभ्यास दोऱ्यातून येथील शहरातील प्रगत कचरा व्यवस्थापन प्रणालीची सखोल पाहणी करण्यात आली.
या दौऱ्यात गोबरधन ( शेण खत) बायो सीएनजी प्लॅंटला भेट देण्यात आली. येथे ओल्या कचऱ्यापासून बायो सीएनजी तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगण्यात आली. या प्रकल्पाच्या माध्यमातून दररोज सुमारे ५०० टन कचऱ्यावर प्रक्रिया करून जवळपास १७ हजार किलो बायो सीएनजी निर्मिती केली जाते. यातील सुमारे ५० टक्के इंधन इंदौरमधील सार्वजनिक बस सेवेसाठी वापरले जाते. तर उर्वरित ५० टक्के ग्रीन फ्यूल म्हणून उद्योगांना पुरवले जाते.
त्यानंतर नगरसेवक मंडळींनी येथील सुक्या कचऱ्यासाठी असलेल्या मटेरियल रिकव्हर फॅसिलिटी या सेंटरला भेट दिली. येथे कचऱ्याचे १८-२० प्रकारांमध्ये वर्गीकरण कसे केले जाते व त्यानंतर त्यावर प्रक्रिया कशी केली जाते याबाबत सविस्तर माहिती व मारगदर्शन करण्यात आले.
हा अभ्यास दौरा रोहा शहरातील कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी व शाश्वत करण्यासाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल. अशी आशावाद प्रतिक्रिया नगराध्यक्ष वनश्री शेडगे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT