वंडर्स पार्क सुविधांचा अभाव
नेरूळ, ता. १५ (बातमीदार) : नेरूळ येथील वंडर्स पार्कमध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होताच नागरिकांसह लहान मुलांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढू लागली आहे. शहरातील तसेच शहराबाहेरील पर्यटक, शाळकरी मुले आणि कुटुंबीयांसाठी हे पार्क विशेष आकर्षणाचे केंद्र बनले असले, तरी येथे काही मूलभूत सुविधांचा अभाव आणि देखभालीकडे होत असलेले दुर्लक्ष यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
वाढत्या गर्दीच्या तुलनेत पार्कमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. विशेषतः स्तनदा मातांसाठी ‘हिरकणी कक्ष’ उपलब्ध नसल्याने महिलांची गैरसोय होत असल्याचे समोर आले आहे. सार्वजनिक ठिकाणी महिलांना स्तनपानासाठी स्वतंत्र कक्ष उपलब्ध करून देण्याबाबत शासनाचे निर्देश असतानाही वंडर्स पार्कमध्ये ही सुविधा नाही. तसेच महिला सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्याचीही मागणी पुढे आली आहे.
याशिवाय पार्कमधील लहान मुलांच्या खेळण्यांच्या परिसरात बसविण्यात आलेल्या सुरक्षात्मक मॅट्स अनेक ठिकाणी फाटलेल्या व उखडलेल्या अवस्थेत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.
नागरिकांच्या मते, पार्कमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असतानाही देखभाल व दुरुस्तीकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या सुविधांची नियमित तपासणी आणि देखभाल नियमितपणे करण्यात यावी, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे.
दरम्यान, महापालिका प्रशासनाने पार्कमधील सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी लवकरच आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असे संकेत दिले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.