मुंबई

बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीला अडथळा

CD

बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीला अडथळा

घाटकोपर, ता. १५ (बातमीदार) : घाटकोपर पश्चिम येथील अत्यंत वर्दळीच्या हिराचंद देसाई मार्गावर सध्या नव्याने पदपथ तसेच भूमिगत विद्युत तारा टाकण्याचे काम सुरू आहे. या कामांमुळे आधीच अरुंद झालेल्या रस्त्यावर आता बेशिस्त दुचाकी पार्किंगची भर पडल्याने वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. विशेषत संध्याकाळी ५ नंतर या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून, वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

हिराचंद देसाई मार्ग हा घाटकोपर स्थानकमार्गे एल. बी. एस. मार्ग तसेच अमृतनगरकडे जाणारा महत्त्वाचा मार्ग मानला जातो. दररोज हजारो वाहनांची या मार्गावरून ये-जा होत असते. मात्र, सध्या सुरू असलेल्या फुटपाथ आणि केबल टाकण्याच्या कामांमुळे रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. त्यातच मेट्रोच्या खांबांखाली तसेच रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात दुचाकी पार्किंग होत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.

रस्त्यालगत अनियमितपणे उभ्या केल्या जाणाऱ्या दुचाकींमुळे वाहनांना मार्ग काढणे कठीण होत असून, अनेक ठिकाणी वाहतूक संथ गतीने सुरू असल्याचे चित्र आहे. पादचाऱ्यांसाठी फुटपाथचे काम सुरू असल्याने त्यांना रस्त्यावरून चालावे लागत आहे. त्यामुळे अपघाताचा धोकादेखील वाढला आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
------------------
पोलिसांशी समन्वय साधणार
दरम्यान, या समस्येबाबत स्थानिक नागरिकांकडून ‘एन’ विभागाच्या प्रभाग समिती अध्यक्षा अश्विनी मते यांच्याकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची गंभीर दखल घेत मते यांनी तातडीने वाहतूक पोलिसांशी संपर्क साधून संबंधित ठिकाणी कारवाई करण्याच्या सूचना दिल्याचे सांगितले आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बेशिस्त पार्किंग हटविणे तसेच वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत पोलिस प्रशासनाशी समन्वय सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात AI आणि ग्रीन डेटा सेंटर पार्कला मंजुरी! AI कंप्यूट हब उभारणार; फडणवीस सरकारचा मेगा प्रकल्प

WTC POINT TABLE: ICCची पाकिस्तानवर मोठी कारवाई! बांगलादेशकडून हरले, त्यात नवीन संकट; भारताला आव्हान द्यायला गेले अन् आपटले

Pune News : नाव देताना विरोधीपक्ष होणार बेदखल; चारऐवजी तीन नगरसेवकांच्या स्वाक्षरीने देता येणार नाव

Katraj News : कात्रज उड्डाणपूल उतरण्याचा मार्ग अखेर मोकळा; कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरण प्रकल्पाला गती

चीनहून परतताच फोन-लॅपटॉप फेकले; डोनाल्ड ट्रम्प यांच्या चीन दौऱ्यानंतर अमेरिकन शिष्टमंडळाचा निर्णय, कारण काय?

SCROLL FOR NEXT