अवयवदानातून सहा जणांना नवजीवन
तुर्भे ता. १३ (बातमीदार) : दुःखाच्या अंधारातून आशेचा किरण देणारी हृदयस्पर्शी घटना फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटल येथे घडली. पनवेल येथील ५० वर्षीय महिलेच्या ब्रेन डेडनंतर त्यांच्या कुटुंबाने धाडसी निर्णय घेत अवयवदानास संमती दिली. या महान निर्णयामुळे किडनी, लिव्हर, फुफ्फुसे, हृदय आणि डोळ्यांचे कॉर्निया गरजू रुग्णांना उपलब्ध झाले असून अनेकांना नवजीवन मिळाले.
यंदा हे तिसरे अवयवदान ठरले असून दुसरे किडनी आणि लिव्हर प्रत्यारोपण यशस्वी झाले. किडनी प्रत्यारोपणाचा लाभ पनवेलमधील ४८ वर्षीय रुग्णाला झाला, जो २०१७ पासून प्रतीक्षा यादीत होता. ही शस्त्रक्रिया डॉ. गौरव कसात यांनी केली. तर कांदिवलीतील ५५ वर्षीय रुग्णावर लिव्हर प्रत्यारोपण डॉ. विक्रम राऊत यांनी यशस्वीरीत्या पार पाडले.
नितीन कामारिया यांनी अवयवदान हे सर्वात मोठे जीवनदायी दान असल्याचे सांगत समाजात जनजागृतीची गरज अधोरेखित केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.