मुंबई

स्मशानभूमींतील सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी नवा निर्णय

CD

स्मशानभूमींतील सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी नवा निर्णय
आयुक्तांकडून कामांच्या जबाबदारींचे वितरण
जुईनगर, ता. १५ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील स्मशानभूमींमधील सेवा अधिक प्रभावी आणि दर्जेदार पद्धतीने उपलब्ध व्हाव्यात, यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आदेश जारी केले आहेत. स्मशानभूमींच्या देखभाल, दुरुस्ती आणि व्यवस्थापनाशी संबंधित कामांच्या जबाबदाऱ्या विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये विभागून दिल्या आहेत.
सद्यःस्थितीत स्मशानभूमींची वार्षिक देखभाल, दुरुस्ती आणि व्यवस्थापनाची कामे स्वच्छता निरीक्षक, विभाग अधिकारी आणि दोन्ही परिमंडळांच्या उपआयुक्तांमार्फत पाहिली जात होती. या पार्श्वभूमीवर सेवांच्या गुणवत्तेत सुधारणा करण्याच्या उद्देशाने नव्या कार्यपद्धतीची अंमलबजावणी करण्यात आली आहे. नवीन आदेशानुसार, नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व दहनभूमी आणि दफनभूमींवर संबंधित प्रभागातील स्वच्छता निरीक्षक तसेच कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) यांचे थेट नियंत्रण राहणार आहे. यामुळे दैनंदिन देखरेख, स्वच्छता, दुरुस्ती आणि आवश्यक सुविधा यांवर अधिक नियमितपणे लक्ष ठेवले जाणार आहे.
तसेच स्वच्छता अधिकारी किंवा स्वच्छता निरीक्षक आणि उपअभियंता किंवा कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) यांनी आपल्या कामांचा अहवाल संबंधित विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्याकडे सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानंतर कार्यकारी अभियंता यांनी सर्व अहवाल तसेच संबंधित कामांची देयके परिमंडळ उपआयुक्तांकडे सादर करावयाची आहेत.

चौकट
उपआयुक्तांचे नियंत्रण
या संपूर्ण व्यवस्थेवर संबंधित परिमंडळ उपआयुक्तांचे नियंत्रण राहणार असून, दहनभूमी, दफनभूमी आणि इतर सर्व प्रकारच्या स्मशानभूमींच्या देखभाल, दुरुस्ती आणि व्यवस्थापनाची अंतिम जबाबदारी त्यांच्यावर निश्चित करण्यात आली आहे. महापालिकेच्या आदेशात स्मशानभूमींशी संबंधित कामांमध्ये मनुष्यबळ पुरवठा, वीजपुरवठा, दहन साहित्याची उपलब्धता, बांधकामविषयक कामे तसेच विविध सोयीसुविधांचा समावेश असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT