मुंबई

पनवेलमध्ये हळदीच्या कार्यक्रमात राडा;

CD

पनवेलमध्ये हळदीच्या कार्यक्रमात राडा;
पूर्ववैमनस्यातून एकाच कुटुंबातील सहा जणांना मारहाण

पनवेल, ता. १५ (वार्ताहर) : जुन्या भांडणाची कुरापत काढून तिघांनी एकाच कुटुंबातील सदस्यांना बेदम मारहाण केल्याची घटना पनवेलमधील तुरमाळे गावातील एका हळदीच्या कार्यक्रमात घडली. या हल्ल्यात एका तरुणाचा डावा खांदा निखळला असून, महिलांसह अन्य पाच जण जखमी झाले आहेत. पनवेल शहर पोलिसांनी तिघांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर पुढील कारवाई सुरू केली आहे.

तुरमाळे येथील मरिआई मंदिराजवळ राहणाऱ्या दिपेश पाटील (२१) याच्या मोठ्या बहिणीचा हळदीचा कार्यक्रम गुरुवारी (ता. १४) रात्री सुरू होता. मध्यरात्री १२.३० च्या सुमारास गावातील अक्षय गायकर, राकेश गायकर आणि सागर गायकर हे त्या ठिकाणी आले. त्यानंतर या तिघांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून दिपेश पाटील आणि त्याच्या कुटुंबीयांशी वाद घालण्यास सुरुवात केली. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले, या वेळी तिघांनी दिपेशला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यात त्याचा डावा खांदा निखळला. सदर त्रिकूट इतक्यावरच थांबले नाही, तर त्यांनी दिपेश याच्या घरातील महिला आणि इतर नातेवाईक वनिता भुमकर, धाकली पाटील, उषा भोपी, अजित पाटील आणि निकेश भुमकर यांनाही बेदम मारहाण केली. भरवस्तीत आणि सार्वजनिक कार्यक्रमात झालेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या घटनेनंतर दिपेशने पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अक्षय गायकर (३५), राकेश गायकर (३०) आणि सागर गायकर (४०) यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ११७(२), ११९(१) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक हजरत पठाण करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Taliban Airstrike Pakistan : पाकिस्तानमध्ये घुसून तालिबानकडून हवाई हल्ला?; अनेक दहशतवादी मारल्याचा अफगाणकडून दावा, सीमावाद उफाळला

Low Calorie Ragi Thalipeeth: डाजबिटीज फ्रेंडली! कॅल्शियम, प्रोटीन आणि फायबरने भरपूर नाचणीचं थालीपीठ; जाणून घ्या सोपी रेसिपी

Pune Shiv Sena setback: पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का; २६ वर्षांतल्या ९ संपर्कप्रमुखांपैकी ५ जणांनी सोडली साथ, चौघे शिंदे गटात

Pune Nashik Railway : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा मूळ मार्ग कायम ठेवण्याचा निर्धार; जीएमआरटीकडून अडथळा नसल्याचा लोकप्रतिनिधींचा दावा

भविष्यवेध : बीएस्सी ॲग्रीकल्चर की बी. फार्मसी?

SCROLL FOR NEXT