मुंबई

विरार-अलिबाग मल्टीमॉडल कॉरिडॉर भूसंपादनातील शेतकऱ्यांना मोबदला मिळणार

CD

विरार-अलिबाग कॉरिडॉरला गती!
उर्वरित शेतकऱ्यांना मोबदला मिळणार

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १५ : विरार-अलिबाग मल्टिमॉडल कॉरिडॉरच्या भूसंपादनामध्ये शेकडो हेक्टर जमीन अधिग्रहित करण्यात आली आहे; मात्र मोबदल्याची रक्कम अत्यल्प असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण होते.
याच मुद्द्यावरून विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत एक बैठक पार पडली असून शेतकऱ्यांना तत्काळ मोबदला देण्याची प्रक्रिया तत्काळ सुरू केली जाणार आहे.
अनेक शेतकऱ्यांना २०२४च्या दरम्यान मोबदल्याचे पैसे मिळाले आहेत; परंतु गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत प्रशासकीय अडचणीमुळे उर्वरित शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला वाटपाचे काम थांबले होते; मात्र आता मोबदला वितरणाचे काम सुरू होत असताना मोबदला रक्कम मात्र कमी मिळत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होता. या विषयात आमदार विक्रांत पाटील यांनी स्वतः लक्ष घालत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत विशेष बैठक घेतली. या बैठकीत शेतकऱ्यांच्या भावना मांडताना विक्रांत पाटील यांनी विरार-अलिबाग मल्टिमॉडल कॉरिडॉरसाठी पूर्वी ५०% मोबदला दिला गेला आहे. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांनासुद्धा तेवढीच रक्कम अथवा शक्य असल्यास जास्तीचा मोबदला देण्याची मागणी केली होती.
---------------------------
न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ
पुणे येथील जमीन अधिग्रहण प्रकरणामध्ये उच्च न्यायालयाने पूर्वीचा मोबदला वाटप सुरू झालेल्या प्रकल्पांना लागू होतात का, याची खात्री करावी तसेच विरार-अलिबाग मल्टिमॉडल कॉरिडॉर हा सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून सर्व शेतकरी योग्य मोबदला घेण्यास तयार असताना मोबदला कमी झाल्याने अडचणी तयार होत आहेत. त्यामुळे योग्य तो निर्णय करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfer: राज्यात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या मोठ्या बदल्या; पुणे, नाशिकमध्येही मोठे फेरबदल, कुणाची बदली कुठे?

Who is Akash Maharaj Singh? ऋतुराज संजू, उर्विल यांना बाद करून खिशातून काढला कागद... काय लिहिलंय माहित्येय? Video Viral

ब्युटी पार्लरमध्ये मार्गदर्शन, पुण्यात विशेष कोचिंग अन्... NEET पेपरफुटीचा ‘मास्टरमाईंड’ पी. व्ही. कुलकर्णी नेमका कोण?

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी केला इंडिगो विमानाने प्रवास

आजोबांच्या धाकाने शेणाने जमीन सारवायची माधुरी दीक्षित; मूळ कोकणातली आहे धकधक गर्ल, गावाचं नाव माहितीये?

SCROLL FOR NEXT