अल्पवयीन मुलीशी विवाह
खारघरमधील तरुणावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल
नवी मुंबई, ता. १५ (वार्ताहर) : अल्पवयीन मुलीसोबत प्रेमविवाह करून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करणे खारघरमधील तरुणाला महागात पडले आहे. खारघर पोलिसांनी या तरुणाविरोधात बलात्कार आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलगी प्रसूतीसाठी सोलापूर येथील रुग्णालयात दाखल झाली असता हा प्रकार उघडकीस आला.
आरोपी तरुण खारघर येथे राहण्यास असून, त्याने २०२४ मध्ये सोलापूर जिह्यातील कुंभारी पारधी कॅम्प येथे अल्पवयीन मुलीशी प्रेमविवाह केला. लग्नानंतर पीडिता आरोपीसोबत खारघर येथे राहण्यास आली. या काळात शारीरिक संबंध आल्याने पीडित गर्भवती राहिली. पीडितेच्या प्रसूतीचा काळ जवळ आल्यानंतर तिला ७ मे रोजी सोलापूर येथील सिव्हिल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीदरम्यान पीडित मुलगी ही अल्पवयीन असल्याचे समोर आले. अल्पवयीन मुलीशी शरीरसंबंध ठेवणे हा कायद्याने गंभीर गुन्हा असल्याने, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती तत्काळ स्थानिक पोलिसांना दिली. त्यानुसार दक्षिण सोलापूरमधील वळसंग पोलिसांनी तरुणाविरोधात बलात्कार आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर शून्य क्रमांकाने हा गुन्हा खारघर पोलिसांकडे वर्ग केला असून, या प्रकरणाची पुढील कारवाई सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.