मुंबई

वेगामुळे पामबीच धोकादायक

CD

वेगामुळे पाम बीच धोकादायक
दर दोन दिवसाआड एक अपघात; वाहतूक पोलिस, महापालिका यांची एकमेकांवर चालढकल
बेलापूर, ता. १५ (बातमीदार) : शहरातील पाम बीच रोड सध्या ‘डेथ रोड’ म्हणून चर्चेत आला असून, गेल्या दोन महिन्यांत १७ हून अधिक लहान-मोठे अपघात घडले आहेत. या अपघातांत दोन जणांचा मृत्यू झाला असून, सहाहून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. वाढता वेग आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन ही अपघातांची प्रमुख कारणे ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे.
पाम बीच मार्ग हा नवी मुंबईतील वेगवान आणि मोकळा मार्ग म्हणून ओळखला जातो. मात्र, अवजड वाहनांची वर्दळ कमी असल्याने चारचाकी व दुचाकी चालकांकडून अतिवेगाने वाहन चालवले जाते. परिणामी हा मार्ग आता जीवघेणा ठरत आहे. यापूर्वी स्पीड गन, सीसीटीव्ही आणि वाहतूक पोलिसांच्या कारवाईमुळे काही प्रमाणात शिस्त होती. मात्र, सध्या या उपाययोजनांचा प्रभाव कमी झाल्याचे दिसून येत आहे.
सिग्नल तोडणे, स्टंटबाजी आणि बेफाम वेगाने वाहन चालवण्याचे प्रकार वाढले असून, पोलिसांच्या देखरेखीअभावी परिस्थिती अधिक गंभीर बनत आहे. नागरिकांकडून कडक उपाययोजना, सतत देखरेख आणि वेगमर्यादेची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी जोर धरत आहे.

चौकट
मुंबई, ठाण्याहून स्टंटसाठी पाम बीच मार्गाची निवड
अलीकडेच एनआरआय, सीवूड्स वाहतूक पोलिसांकडून वारंवार नाकाबंदी, कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात येत आहे. यामध्ये काही स्टंटमॅन आपल्या स्पोर्ट्स बाईकसह पकडण्यात आले. यांची विचारपूस केली असता कुर्ला, बोरिवली, ठाणे परिसरातून हे स्टंटमॅन मोकळा रस्ता, अल्प कारवाई यामुळे पाम बीच मार्गावर स्टंट करत असल्याचे निदर्शनास आले.

बॉक्स
जानेवारी ते मे १४ पर्यंत पाम बीच मार्गावरील वाहतूक पोलिस सामूहिक कारवाई :
ड्रिंक अँड ड्राइव्ह - २४३
सिग्नल जम्पिंग - ३२६
धोकादायक वाहन चालवणे - ११८
विनाहेल्मेट - ११३२
विरुद्ध दिशेने वाहन चालवणे - ७३२

बॉक्स
जानेवारी ते मे १४ पर्यंत जखमी, मृत आकडेवारी
जखमी - १७
मृत - ५
कोट
सेक्टर ५० सीवूड्स, अक्षर टॉवर या ठिकाणी आमची नाकाबंदी सुरू आहे. आवश्यक जनजागृतीदेखील करत आहोत. मात्र, नागरिकांनीदेखील स्वतःच्या जीवाची किंमत ओळखत वाहने चालवावीत असे आवाहन आम्ही करतो.
- देवेंद्र पोळ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, एनआरआय सागरी पोलिस ठाणे

कोट
आम्ही स्पोर्ट्स बाइक, ड्रिंक अँड ड्राइव्ह यावर करडी नजर ठेवून आहोत. अलीकडच्या काळात कारवाईला वेग आला आहे. आम्ही प्रवाशांना आवाहन करतो वाहतुकीचे नियम पाळत प्रवास करा.
- मोहिनी लोखंडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सीवूड्स वाहतूक शाखा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Murder Case : केतनला धक्का कोणी दिला? पक्का पुरावाच नाही; पोलिसांनी कोर्टाकडे मागितली सियाच्या 'लाय डिटेक्टर' चाचणीची परवानगी

मुंबईसे वांद्रे कैसे जाते है? थेट पाकिस्तानमधून फोन आल्यानं खळबळ, पोलिसांकडून चौकशी सुरू

Shardul Thakur: शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली माझ्यासोबत अन्याय झाला! शार्दुल ठाकूरचा थेट आरोप; टीम इंडियाबाबत केला मोठा खुलासा

'तुझे केस विचित्र आहेत' ऑडिशनवेळी मंदार जाधवला दिलेलं रिजेक्शनचं विचित्र कारण, म्हणाला...

Amol Kolhe leaving Sharad Pawar : खासदार अमोल कोल्हे शरद पवारांची साथ सोडणार?; 'महायुतीकडून ऑफर आल्यास विचार करू'

SCROLL FOR NEXT