ठाणे, ता. १५ : शेअर ट्रेडिंग आणि आयपीओ गुंतवणुकीत मोठा नफा मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवत ठाण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल २४ लाख ६५ हजार ८३९ रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कापूरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.
ढोकाळी येथील तक्रारदार भालचंद्र अय्यर (६९) हे सेवानिवृत्त आहेत. ऑक्टोबरमध्ये समाज माध्यमाद्वारे ‘दिव्या’ नावाच्या महिलेने त्यांच्याशी संपर्क साधला. तिने शेअर ट्रेडिंग आणि आयपीओ गुंतवणुकीत मोठा परतावा मिळेल, असे सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर अय्यर यांना व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे विविध गुंतवणुकीचे सल्ले देत पैसे गुंतविण्यास प्रवृत्त केले. दिव्या आणि तिच्या साथीदारांनी दिलेल्या विविध बँक खात्यांमध्ये अय्यर यांनी २२ ऑक्टोबर २०२५ ते २६ एप्रिल २०२६ या कालावधीत एकूण २४.६५ लाख रुपये ऑनलाइन पाठवले. मात्र, संबंधित संकेतस्थळावर गुंतवणुकीत मोठा नफा दिसत होता. प्रत्यक्षात पैसे परत काढता येत नव्हते. संबंधितांशी संपर्कही तुटला. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे अय्यर यांच्या लक्षात येताच तातडीने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार कापूरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.