मुंबई

जीर्ण इमारतीत स्वत:च्या जाेखमीवर राहा!

CD

जीर्ण इमारतीत स्वत:च्या जाेखमीवर राहा!

उच्च न्यायालयाची ८० वर्षीय नागरिकास परवानगी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ ः स्वत:च्या जाेखमीवर राहण्यास तयारी दाखवणाऱ्या ८० वर्षीय नागरिकास जीर्ण झालेल्या इमारतीत वास्तव्‍य करण्यास तात्पुरती परवानगी उच्च न्यायालयाने दिली आहे. तसेच मानवतेच्या दृष्टिकाेनातून त्यांच्या सदनिकेचा ताेडण्यात आलेला वीज आणि पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे आदेश नुकतेच न्या. अद्वैत सेठना आणि न्या. संदेश पाटील यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने दिले.

वांद्रे पश्चिमेतील आनंद रूप सहकारी गृहनिर्माण संस्थेची इमारत महापालिकेने अतिधोकादायक असल्याचा दावा केला होता; मात्र याचिकाकर्ते घनश्यामसिंग नारंग यांनी या इमारतीत जोखमीवर राहण्याची तयारी दर्शवली. त्यावर त्यांचे वय आणि पर्यायी जागेवर स्थलांतरित होण्याची व्यवस्था करण्यासाठी पुरेसा वेळ देणे आवश्यक आहे. याचिकाकर्ते १९७५पासून इमारतीत वास्तव्यास आहे. या वयात अचानक त्यांना विस्थापित व्‍हावे लागल्यास गैरसाेयींना सामाेरे जावे लागू शकते, असे नमूद करून न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत त्यांना ‘स्वतःच्या जोखमीवर’ मोडकळीस आलेल्या इमारतीत राहण्यास परवानगी दिली. याप्रकरणी २५ मे राेजी पुढील सुनावणी हाेणार आहे.

प्रकरण काय?
वांद्रे पश्चिमेतील आनंद रूप सहकारी गृहनिर्माण संस्थेची इमारत ‘अत्यंत धोकादायक’ म्हणून वर्गीकृत करून महापालिकेने इमारतीचा पाणी आणि वीजपुरवठा खंडित केला आहे. त्याला घनश्यामसिंग नारंग यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. तसेच इमारतीच्या संरचना स्थिरतेच्या पालिकेच्या तांत्रिक सल्लागार समितीने दिलेला अहवाल कायदेशीरदृष्ट्या टिकणारा नसल्याचे सांगून त्यालाही नारंग यांनी आव्हान दिले आहे. त्यावर अनेक रहिवाशांनी आधीच सदनिका रिकामी केल्याची माहिती महापालिकेने दिली हाेती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lohgad Ketan Agarwal Death Case : पावसात लोहगडावर चेतन चौधरीकडून सीन रिक्रिएशन; केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाच्या तपासाला वेग

Kolhapur Child Death : अवघ्या 4 दिवसांपूर्वीच साजरा केला होता वाढदिवस, खेळता खेळता 4 वर्षांच्या रियांशचा गोबर गॅसच्या टाकीत पडून मृत्यू; साबळेवाडीतील घटनेने हळहळ

सचिन अहिर अपात्र ठरणार की वाचणार? पक्षांतरबंदी कायद्यात नेमकं काय? उपसभापती पद ठरणार कवच

Khadakwasala Dam : खडकवासला धरणसाखळीत जूनमध्ये पावसाची शंभरी

मुंबईत संततधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिराने; अनेक भाग जलमय, ४ दिवस ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT