मुंबई

मुंबई वडोदरा रस्त्यावर दुगाड येथील अपघातात भिवंडीतील दोन युवकांचा दुर्दैवी मृत्यू

CD

मुंबई-वडोदरा महामार्गावर भीषण अपघात; भिवंडीतील दोन युवकांचा मृत्यू

भिवंडी, ता. १५ (वार्ताहर) : मुंबई-वडोदरा महामार्गावर दुगाड येथे झालेल्या भीषण अपघातात भिवंडीतील दोन युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शुक्रवारी (ता. १५) घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. झिशान अन्सारी (वय २०, रा. पिरानी पाडा) आणि इमरान अन्सारी (वय २५, रा. पटेल कंपाउंड, धामणकर नाका) अशी मृतांची नावे आहेत. दोघेही वॉलपेपर लावण्याचे काम करीत होते.
कामानिमित्त अंबाडी परिसरात गेलेले झिशान आणि इमरान दुचाकीवरून भिवंडीकडे परतत होते. मोहिली-दुगाड परिसरात रस्ते बांधकामासाठी माल वाहतूक करणाऱ्या डम्परला त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक बसली. अपघात इतका भीषण होता, की दोघांनाही गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच गणेशपुरी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडी येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या दुर्घटनेमुळे मृत युवक राहत असलेल्या परिसरात शोककळा पसरली असून मुंबई-वडोदरा महामार्गावरील वाढत्या अपघातांबाबत पुन्हा चिंता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Taliban Airstrike Pakistan : पाकिस्तानमध्ये घुसून तालिबानकडून हवाई हल्ला?; अनेक दहशतवादी मारल्याचा अफगाणकडून दावा, सीमावाद उफाळला

Low Calorie Ragi Thalipeeth: डाजबिटीज फ्रेंडली! कॅल्शियम, प्रोटीन आणि फायबरने भरपूर नाचणीचं थालीपीठ; जाणून घ्या सोपी रेसिपी

Pune Shiv Sena setback: पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का; २६ वर्षांतल्या ९ संपर्कप्रमुखांपैकी ५ जणांनी सोडली साथ, चौघे शिंदे गटात

Pune Nashik Railway : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा मूळ मार्ग कायम ठेवण्याचा निर्धार; जीएमआरटीकडून अडथळा नसल्याचा लोकप्रतिनिधींचा दावा

भविष्यवेध : बीएस्सी ॲग्रीकल्चर की बी. फार्मसी?

SCROLL FOR NEXT