मुंबई

राव, भारद्वाज यांच्याकडून अटींचे उल्लंघन

CD

राव, भारद्वाज यांच्याकडून अटींचे उल्लंघन

जामीन रद्द करण्यासाठी एनआयएचा न्यायालयात अर्ज

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : एल्गार परिषद आणि शहरी नक्षलवाद प्रकरणातील आरोपी तेलुगु कवी वरवरा राव आणि वकील सुधा भारद्वाज यांनी जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्याचा दावा करून त्यांचा जामीन रद्द करण्याची मागणी करणारा अर्ज राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) शुक्रवारी (ता. १५) मुंबईतील विशेष न्यायालयात केला आहे. एनआयएच्या या अर्जाची दखल घेऊन न्यायालयाने राव आणि भारद्वाज यांना उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले. 

राव आणि भारद्वाज हे दोघेही यावर्षी १९ जानेवारीला ‘मुंबई प्रेस क्लब’ येथे आयोजित कार्यक्रमात प्रकरणातील इतर सह-आरोपींसह उपस्थित होते. त्यामुळे राव आणि भारद्वाज यांनी न्यायालयाच्या अटींचे उल्लंघन केल्याचा दावा करून एनआयएने जामीन रद्द करण्याची मागणी केली आहे. कार्यक्रमानंतर दोन दिवसांनी एनआयएच्या अधिकाऱ्यांनी मुंबई प्रेस क्लबच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्याच वेळी क्लबनेही अंतर्गत चौकशी समितीच्या अहवालानंतर आपल्या तीन सदस्यांचे निलंबन केले होते. कनिष्ठ न्यायालयाने ७ मे रोजी या तीन सदस्यांपैकी एक गुरबीर सिंग यांच्या हकालपट्टीला स्थगिती दिली. ही कारवाई केवळ त्यांना क्लबची निवडणूक लढवण्यापासून रोखण्याच्या उद्देशाने केल्याचे मत नोंदवून न्यायालयाने सिंग यांना निवडणूक लढवण्याची परवानगीही दिली होती.

कार्यक्रमात पुढील वाटचालीवर चर्चा
प्रेस क्लब येथील कार्यक्रमाचा उद्देश, सीपीआय (माओवादी)ची विचारसरणी आणि शहरी नक्षल चळवळीच्या पुढील वाटचालीवर चर्चा करणे असल्याचा दावा एनआयएने आपल्या अर्जात केला आहे. जामीन रद्द करण्याची मागणी करणाऱ्या आपल्या अर्जासह एनआयएने ‘मुंबई प्रेस क्लब’च्या चौकशी समितीच्या अहवालाची प्रत आणि सदर कार्यक्रमाचे सीसीटीव्ही चित्रीकरणही जोडले आहे. आरोपींच्या सीडीआरचाही संदर्भ दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: चेन्नई सुपर किंग्सचे अंतिम ४ मध्ये पोहोचणे अवघड! लखनौ सुपर जायंट्सने स्वतःसह त्यांची पण वाट लावली...

महाराष्ट्रात मालमत्ता वादांवर लगाम लागणार! मोजणीशिवाय आता होणार नाही म्युटेशन; फ्लॅटधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार

Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! संजय दराडे पुण्याचे सह पोलिस आयुक्त तर गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी तेजस्वी सातपुते

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्स एका फटक्यात तीन संघांचा कार्यक्रम करणार; एक गणित ज्याने भल्याभल्यांची झोप उडणार

Mumbai News : गुगल बरोबर ॲपललाही नोटीस; बाईक टॅक्सी सेवेला झटका, राज्य सायबर विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT