खाकी, ‘प्रेस’चा धाक दाखवत टेम्पोचालकाला मारहाण
अंबरनाथमध्ये दोन कथित पत्रकारांविरोधात गुन्हा
अंबरनाथ, ता. १५ (वार्ताहर) : स्वतःला पोलिस आणि पत्रकार असल्याचे सांगत मालवाहू टेम्पोचालकाचा पाठलाग करून त्याला रस्त्यात अडवून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना अंबरनाथमध्ये गुरुवारी (ता. १४) उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दोन जणांविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिश वासू भाटीया (वय २५, रा. उल्हासनगर) हे पहाटे ४च्या सुमारास आपल्या मालवाहू टेम्पोने अंबरनाथ पूर्वेतील रिलायन्स मॉलच्या दिशेने जात होते. या वेळी साई रेसिडेन्सी परिसरात आरोपींनी त्यांच्या वाहनाचा पाठलाग करून टेम्पो अडवला.
याप्रकरणी संजय रामप्रसाद सिंग (वय ३१, रा. जुना दुर्गापाडा, उल्हासनगर) आणि स्मिता एकनाथ पवार (वय ४४, रा. मानेरे गाव रोड, उल्हासनगर) अशी आरोपींची नावे आहेत. तक्रारीनुसार, ‘तुझ्या वाहनात गोमांस वाहतूक केली जात आहे,’ असा आरोप करत संजय सिंग याने स्वतःला पोलिस असल्याचे सांगितले, तर त्याच्यासोबत असलेल्या स्मिता पवार हिने स्वतःला पत्रकार असल्याचे सांगत चालकाला धमकावले. आरोपींनी शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप हरीशने केला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्र कोल्हे करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.