मुंबई

विषय पत्रिका मंजुरीवरून महासभेत गदारोळ

CD

ठाणे पालिकेच्या महासभेत गदारोळ
विषयपत्रिका मंजुरीवरून सत्ताधारी आमनेसामने

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ : ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत विषयपत्रिका मंजुरीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यात तीव्र वाद निर्माण झाला. विषयपत्रिकेवर चर्चा न करता घाईघाईने २३२ पैकी २३१ विषय मंजूर करण्यात आल्याचा आरोप करत भाजप नगरसेवकांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली. या गोंधळामुळे महासभेत काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
सुरुवातीला शुक्रवारी (ता. १५) पार पडलेल्या महासभेत लक्षवेधी सूचना, त्यानंतर विषयपत्रिका आणि मग प्रश्नोत्तरांचा तास घेण्याचे सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत ठरले होते. याची कबुली महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनीही सभागृहात दिली. मात्र, प्रत्यक्ष सभेत सुरुवातीलाच लक्षवेधी घेतल्यानंतर थेट विषयपत्रिकेवरील कामकाज सुरू करण्यात आले. या वेळी शिवसेना नगरसेवक राजेश मोरे यांनी हवामान बदलामुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईच्या संकटाबाबत लक्षवेधी मांडली. त्यानंतर नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी स्थायी समितीसह इतर समित्या अद्याप गठित का करण्यात आल्या नाहीत, असा सवाल उपस्थित केला. या मुद्द्यावर भाजप नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली. सचिव मनीष जोशी यांनी लवकरच बैठक घेऊन समित्यांबाबत निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले.
मात्र प्रश्नोत्तरांचा तास न घेता थेट विषयपत्रिका सुरू करण्यात आल्याने भाजप सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला. भाजप गटनेते मुकेश मोकाशी यांनी विषयपत्रिकेवर चर्चा न करता मंजुरी देणे ही चुकीची परंपरा असल्याचे सांगत प्रशासनाला धारेवर धरले. उपमहापौर कृष्णा पाटील यांनीही “विषयपत्रिकेवर चर्चा होणार नसेल, तर आम्ही सभात्याग करू,” असा इशारा दिला.
गोंधळ वाढत असताना महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी गटनेत्यांच्या बैठकीत ठरल्याप्रमाणेच कामकाज सुरू असल्याचे सांगितले. मात्र, त्यानंतर वातावरण अधिक तापले आणि भाजप नगरसेवक थेट महापौरांच्या डायससमोर पोहोचले. “लोकशाहीची हत्या”, “शिवसेना हाय हाय” अशा घोषणा देत भाजप सदस्यांनी सभागृह दणाणून सोडले. या गदारोळात शिंदे सेनेकडून “प्रश्नोत्तरे घ्या” अशा घोषणा देण्यात आल्या. दरम्यान, गोंधळाच्या वातावरणात ३०८ क्रमांकाचा विषय वगळता उर्वरित २३१ विषय मंजूर करण्यात आले आणि राष्ट्रगीत सुरू करून महासभा संपविण्यात आली. यानंतर भाजपने राष्ट्रगीताचा अवमान झाल्याचा आरोप करत नौपाडा पोलिस ठाण्यात धाव घेतली. मनोज शिंदे आणि राजेश मोरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीही भाजपकडून करण्यात आली. उपमहापौर कृष्णा पाटील यांनी शिवसेनेवर मनमानी कारभाराचा आरोप करत, “पाच मिनिटांत शेकडो विषय मंजूर करण्याच्या पद्धतीला भाजपचा विरोध आहे,” असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

Agriculture Day Celebration: घोडेगावात कृषी दिन उत्साहात साजरा; आधुनिक तंत्रज्ञान, सामाजिक संस्थांच्या सहकार्याने शेतकऱ्यांचा सन्मान

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

श्रीसंतला मोठा दिसाला! KCA ने घातलेली तीन वर्षांची बंदी उठवली, नेमका काय होता आरोप?

SCROLL FOR NEXT