नवी मुंबईच्या येनपुरे,
साकोरे यांना बढती
नवी मुंबई, ता. १५ (वार्ताहर) : नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील वरिष्ठ फळीत मोठे बदल झाले असून, अनेक अनुभवी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत तर काहींना पदोन्नती मिळाली आहे. नवी मुंबईचे पोलिस सहआयुक्त संजय येनपुरे यांची पदोन्नती झाली असून त्यांची नियुक्ती आता ‘विशेष पोलिस महानिरीक्षक (व्ही.आय.पी. सुरक्षा)’ या महत्त्वपूर्ण पदावर करण्यात आली आहे. त्यांच्या रिक्त जागी नवी मुंबईचेच अपर पोलिस आयुक्त दीपक साकोरे यांची पदोन्नतीने पोलिस सहआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
चार उपायुक्तांच्या बदल्या
नवी मुंबई आयुक्तालयातील चार उपायुक्तांच्या बदल्या इतर शहरांत करण्यात आल्या आहेत. पंकज डहाणे (डीसीपी, परिमंडळ-१) यांची नियुक्ती पोलिस उपायुक्त, बृहन्मुंबई या पदी झाली आहे. प्रशांत मोहिते (डीसीपी, परिमंडळ-३) यांची बदली पोलिस उपायुक्त, छत्रपती संभाजीनगर शहर येथे झाली आहे. तिरुपती काकडे (डीसीपी, वाहतूक) यांची पोलिस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा (रायगड) म्हणून बदली झाली आहे. प्रीती टिपरे (डायल ११२) यांची पोलिस उपायुक्त, मिरा-भाईंदर-वसई-विरार येथे रवानगी करण्यात आली आहे.
नवे चेहरे
शहरातील रिक्त होणाऱ्या पोलिस उपायुक्तपदांवर अनुभवी अधिकाऱ्यांची वर्णी लागली आहे. विशाल ठाकूर पोलिस उपायुक्त (प्रकटीकरण-१) वरून नवी मुंबई पोलिस उपायुक्त म्हणून पदभार स्वीकारतील. योगेश चव्हाण हे राज्य गुप्त वार्ता विभागातून नवी मुंबईत पोलिस उपायुक्त म्हणून येत आहेत. राहुल खाडे अन्न व औषधी प्रशासन (मुंबई) येथून नवी मुंबई पोलिस उपायुक्तपदी रुजू होतील. तानाजी चिखले हे महामार्ग सुरक्षा (रायगड) येथून ‘डायल ११२’ नवी मुंबईचा कार्यभार सांभाळतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.