मुंबई

एक्सप्रेसवर भरधाव बसची चार कारना धडक; तीन गंभीर

CD

एक्स्प्रेस वेवर भरधाव बसची
चार कारना धडक; तीन गंभीर

खालापूर, ता. १५ (बातमीदार) ः मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर शुक्रवार (ता. १५) अपघातांचा वार ठरला असून तीन ट्रकच्या अपघातानंतर दोन तासांच्या अंतराने पुन्हा अपघात झाला आहे. मिसिंग लिंकपासून शंभर मीटरवर भरधाव बसने चार कारना धडक दिल्याने तीन जण गंभीर जखमी झाले असून चार जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. पुण्याहून मुंबईकडे येणारी खासगी प्रवासी बस खोपोली हद्दीत आली असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुढे असणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. यामुळे एकापाठोपाठ चार कार एकमेकांवर आदळल्याने कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. एका कारमधील प्रवाशाचा हात चेपलेला दरवाजात अडकून बसल्याने आयआरबी पथक, देवदूत पथक, हेल्थ फाउंडेशन पथक आणि खोपोली पोलिस निरीक्षक यांनी तातडीची यंत्रणा उभी करत कटरच्या साह्याने दरवाजा कापून जखमी प्रवाशाची सुटका केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT