जनता मार्केट परिसरात पोलिसांची धडक कारवाई
अतिक्रमण हटवून वाहतूक कोंडीला दिलासा; देहव्यापाराविरोधातही कठोर पावले
नवी मुंबई, ता. २२ (वार्ताहर) : तुर्भे रेल्वे स्थानक परिसरातील जनता मार्केट भागात वाढती वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील अतिक्रमणे आणि देहव्यापाराच्या वाढत्या तक्रारींची गंभीर दखल एपीएमसी पोलिसांनी घेतली आहे. पोलिसांनी अतिक्रमण विभागाच्या सहकार्याने विशेष मोहीम राबवली. या कारवाईमुळे परिसरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली असून, स्थानिक आणि वाहनधारकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
तुर्भे रेल्वे स्थानकालगत जनता मार्केट परिसरात काही दुकानदार आणि व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केल्याने वाहतुकीची समस्या गंभीर बनली होती. याबाबत नागरिकांकडून वारंवार तक्रारी करण्यात येत होत्या. याची दखल घेऊन एपीएमसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आबासाहेब पाटील व त्यांच्या पथकाने नुकतीच अतिक्रमण विभागासोबत संयुक्त कारवाई करीत रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविली, तर याच परिसरातील देहव्यापारावर पोलिसांनी कारवाई केली.
पोलिस आणि पालिकेच्या संयुक्त कारवाईमुळे जनता मार्केट परिसरातील शिस्त व सुव्यवस्था राखण्यास मदत होत असून, या कारवाईनंतर परिसरात सकारात्मक बदल दिसून येत आहेत. आम्ही व्यापारी व नागरिकांना नियमांची माहिती देत आहोत. अनेकांनी अतिक्रमण स्वतःहून काढण्यास सुरुवात केली आहे. अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार आहेत.
- आबासाहेब पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, एपीएमसी पोलिस ठाणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.