मुंबई

खारघरमधील व्हॅली शिल्प सोसायटीला तीव्र पाणीटंचाई,

CD

पाणीपुरवठ्याबाबत भेदभाव
खारघरमधील व्हॅली शिल्प सोसायटीला तीव्र पाणीटंचाई
खारघर, ता. २१ (बातमीदार) : खारघर येथील व्हॅली शिल्प सोसायटीने पाणीपुरवठ्याबाबत भेदभावाचा आरोप केला जात आहे. नियमित कर भरूनही हक्काच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने रहिवाशांमध्ये असंतोष पसरला आहे. यासंदर्भातील निवेदन रहिवाशांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक आणि पालिका आयुक्तांना दिली आहे.
व्हॅली शिल्पमध्ये पाच हजारांहून अधिक रहिवासी वास्तव्य करीत आहे. परंतु, या सोसायटीत पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. तर, या सोसायटीपासून काही अंतरावर असलेल्या साई एम्पायर सोसायटीला अखंड किंवा तुलनेने अधिक चांगला पाणीपुरवठा होत असल्याची माहिती समोर आल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. दोन सोसायट्यांमध्ये पाणीपुरवठ्याबाबत असा भेदभाव का केला जात आहे, असा सवाल रहिवाशांनी उपस्थित केला आहे. समान कर भरणाऱ्या नागरिकांना समान सुविधा मिळायला हव्यात, अशी त्यांची भूमिका आहे. सिडकोने तत्काळ पाणीपुरवठा धोरण जाहीर करून सर्व सोसायट्यांना समान व न्याय्य पाणीवाटप सुनिश्चित करावे, तसेच या समस्येच्या कायमस्वरूपी निराकरणासाठी कृती आराखडा जाहीर करावा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. यासंदर्भात पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. बी. गायकवाड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.

समान कर भरत असताना समान पाणीपुरवठा आणि समान वागणूक मिळाली पाहिजे. मात्र, शेजारील सोसायटीत मुबलक पाणीपुरवठा असल्याचे समजले. सिडकोकडून पाणीवाटपात भेदभाव केला जात असल्याचे दिसून येते.
- ज्ञानेश दराडे, व्हॅली शिल्प सोसायटी पदाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Employee: सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात थेट २० टक्के वाढ; पश्चिम बंगाल सरकारचा मोठा निर्णय

मोदींच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार, शिंदेसेनेला मिळणार आणखी दोन मंत्रीपद? या बड्या नेत्यांवर मोठी जबाबदारी सोपवणार!

कोचिंग सेंटरला भीषण आग; अग्निशमन दलाच्या १४ गाड्या घटनास्थळी दाखल, अनेक विद्यार्थी अडकले, जीव वाचवण्यासाठी धडपड

Eastern Freeway: एमएमआरडीएच्या विस्तारीकरण प्रकल्पात बदल, ९४९ झाडे वाचणार; प्रशासनाचा नवा प्लॅन काय?

Latest Marathi News Live Update : ठाकरेंच्या ६ फुटीर खासदारांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

SCROLL FOR NEXT