पनवेल, ता. २२ (बातमीदार) : कोरोनामध्ये आर्थिक संकटात सापडलेल्या शहरी पथविक्रेत्यांना (फेरीवाल्यांना) पुन्हा सक्षमपणे उभारी देण्यासाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (पीएम स्वनिधी) योजनेची अंमलबजावणी पालिकेमार्फत वेगाने सुरू आहे. या योजनेची मुदत आता डिसेंबर २०३० पर्यंत वाढविण्यात आली आहे. याअंतर्गत फेरीवाल्यांना कोणत्याही तारणाशिवाय खेळते भांडवली कर्ज, व्याज अनुदान आणि डिजिटल व्यवहारांसाठी विशेष प्रोत्साहन दिले जात आहे.
पनवेल पालिकेच्या दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान विभागामार्फत पात्र पथविक्रेत्यांना तीन टप्प्यांत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. पहिल्या टप्प्यात १५ हजार रुपये व परतफेड कालावधी १२ महिने, दुसऱ्या टप्प्यात २५ हजार रुपये व परतफेड कालावधी १८ महिने आणि तिसऱ्या टप्प्यात ५० हजार रुपये व परतफेड कालावधी ३६ महिने असे कर्ज दिले जाते. कर्जाची परतफेड वेळेत करणाऱ्या लाभार्थ्यांना पुढील टप्प्यातील कर्जासाठी पात्रता मिळते. योजनेंतर्गत लाभार्थ्यांना वार्षिक सात टक्के व्याज अनुदान मिळत असून, वेळेवर परतफेड करणाऱ्यांना कोणताही प्री-पेमेंट दंड आकारला जात नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.