मुंबई

पक्षफोडीचे राजकारण म्हणजे लोकशाहीविरोधी षडयंत्र

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २२ : राजकीय पक्ष फोडणे, लोकप्रतिनिधींची खरेदी-विक्री करणे आणि सत्तेसाठी पडद्यामागे छुप्या रणनीती आखणे ही केवळ राजकीय खेळी नसून लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांवर घाला घालणारी संघटित प्रवृत्ती असल्याची टीका ॲड. संजय घाडीगांवकर यांनी केली. अशा प्रकारच्या राजकारणामुळे मतदारांचा लोकशाहीवरील विश्वास डळमळीत होत असून व्यवस्थेचे दीर्घकालीन नुकसान होत असल्याचे त्यांनी म्हटले.
लोकशाही व्यवस्थेत मतदार हा विशिष्ट विचारसरणी, पक्षाचे धोरण आणि जाहीरनाम्यावर विश्वास ठेवून आपला प्रतिनिधी निवडून देत असतो. मात्र, निवडून आल्यानंतर प्रलोभनांना बळी पडून पक्षांतर करणारे लोकप्रतिनिधी केवळ पक्ष बदलत नाहीत, तर लाखो मतदारांच्या विश्वासालाही तडा देतात. कायद्याच्या चौकटीत हे कृत्य बसत असले तरी नैतिकदृष्ट्या हा लोकशाहीवरील गंभीर आघात असल्याचे घाडीगांवकर यांनी नमूद केले. पक्षफोडीच्या राजकारणामागे अनेकदा पैशाचे बळ, सत्तेचा प्रभाव आणि विविध प्रकारची प्रलोभने कार्यरत असल्याचा आरोप करत त्यांनी अशा प्रवृत्ती लोकशाही प्रक्रियेसाठी घातक असल्याचे सांगितले.
दरम्यान, अशा राजकीय घडामोडींमुळे प्रशासनाचे लक्ष विकासकामांवरून हटते आणि जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होते, असेही त्यांनी सांगितले. सत्ता मिळविणे किंवा टिकविणे यासाठी सुरू असलेल्या राजकीय हालचालींमध्ये सार्वजनिक हिताचे प्रश्न मागे पडतात. परिणामी जनतेच्या करातून उभारलेली यंत्रणा लोककल्याणाऐवजी राजकीय व्यवस्थापनात गुंतल्याचे चित्र निर्माण होत असल्याची टीका त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lionel Messi ने इतिहास रचला! वर्ल्ड कपमध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला; पेनल्टी हुकली, पण विक्रमाची संधी साधली...

England Squad vs India T20I: भारताविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर; वैभव सूर्यवंशीला रोखण्यासाठी २२ वर्षीय ऑलराऊंडरला संधी

LPG Shortage: पुन्हा गॅस संकट! कतारमधील गॅस प्लांटमध्ये भीषण स्फोट; १३ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये भारतीयांचा समावेश

Bajrang Sonawane: बीडमधील खून प्रकरणात खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलावर आरोप, गुन्हा दाखल करण्याची मागणी

Pune Water Issue : पाणीप्रश्‍नावरून प्रशासन धारेवर! नियोजन कोलमडल्याचा नगरसेवकांचा आरोप

SCROLL FOR NEXT