मुंबई

ट्रेझर हंट, कार डेकोरेशन स्पर्धेतून अवयवदानाचा संदेश

CD

मुंबई, ता. २२ ः अवयवदानाबाबत जनजागृती करून अधिकाधिक नागरिकांना अवयवदानासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)- एनईबीएस आणि झायनोवा शाल्बी रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने घाटकोपर येथे विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ट्रेझर हंट आणि कार डेकोरेशन स्पर्धांच्या माध्यमातून सहभागी नागरिकांनी अवयवदानाचे महत्त्व अधोरेखित केले.

या उपक्रमात डॉक्टर, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. अवयवदानाचे महत्त्व सांगणारे फलक हातात घेऊन जनजागृती करण्यात आली. विविध स्पर्धांद्वारे अवयवदान हा मानवतेचा सर्वोच्च दान प्रकार असल्याचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला. कार्यक्रमाला आयएमए-एनईबीएसचे अध्यक्ष डॉ. कल्पेश शाह, सचिव डॉ. उर्वी महेश्वरी, खजिनदार डॉ. नेहा शाह, आयएमएचे अन्य पदाधिकारी व सदस्य तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ) रेनी वर्गीस उपस्थित होते.

या वेळी डॉ. कल्पेश शाह म्हणाले, अवयवदान ही केवळ वैद्यकीय नव्हे तर सामाजिक जबाबदारी आहे. समाजाच्या प्रत्येक स्तरावर याबाबत जागरूकता निर्माण होणे आवश्यक आहे. अशा उपक्रमांमुळे नागरिकांना अवयवदानासाठी प्रेरणा मिळते. ब्रेन डेड व्यक्तीचे डोळे, त्वचा, यकृत, मूत्रपिंड, हृदय, फुप्फुसे आणि स्वादुपिंड यांसारख्या अवयवांचे दान करून अनेकांचे प्राण वाचवता येऊ शकतात.

रेनी वर्गीस म्हणाले, एका अवयवदात्यामुळे अनेक रुग्णांना नवजीवन मिळू शकते; मात्र जागरूकतेचा अभाव आणि कमी नोंदणीमुळे अनेकांना अवयव प्रत्यारोपणासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागते. जनजागृती ही अवयवदानाचे प्रमाण वाढविण्याची पहिली पायरी आहे. समाजातील गैरसमज दूर करून कुटुंबांमध्ये अवयवदानाबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत.

अवयवदानाविषयी जागरूकता वाढवावी

भारतामध्ये दरवर्षी हजारो रुग्ण अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असतात; मात्र अवयवदात्यांची संख्या अत्यल्प असल्याने अनेकांना वेळेत अवयव उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे अवयवदानाविषयी जागरूकता वाढविणे आणि अधिकाधिक नागरिकांनी अवयवदानासाठी पुढाकार घेणे, ही काळाची गरज असल्याचे या कार्यक्रमातून अधोरेखित करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Employee: सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात थेट २० टक्के वाढ; पश्चिम बंगाल सरकारचा मोठा निर्णय

मोदींच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार, शिंदेसेनेला मिळणार आणखी दोन मंत्रीपद? या बड्या नेत्यांवर मोठी जबाबदारी सोपवणार!

Crime: मुलगी सून म्हणून नकोच, प्रियकराच्या आईचा हट्ट, प्रेयसी संतापली अन्...; मुलाच्या आईसोबत धक्कादायक कृत्य घडलं

कोचिंग सेंटरला भीषण आग; अग्निशमन दलाच्या १४ गाड्या घटनास्थळी दाखल, अनेक विद्यार्थी अडकले, जीव वाचवण्यासाठी धडपड

Latest Marathi News Live Update : ठाकरेंच्या ६ फुटीर खासदारांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

SCROLL FOR NEXT